Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांच्या मागणीला यश … शासनाने घेतली दखल, वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य घेण्यास दिली १ कोटीच्या निधीस मंजुरी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ एप्रिल) : राज्यात “ कोव्हिड -१९ ” ( Covid १ ९ ) विषाणुमूळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी “ महाराष्ट्र कोव्हिड -१९ ( Covid १ ९ ) , उपाययोजना अंतर्गत गोरगरीब रुग्णांच्या उपचारासाठी तातडीचे उपाययोजना करण्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

त्याचीच दखल घेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या “ कोव्हिड -१ ९ ” ( Covid १ ९ ) विषाणूबाबत जिल्हा पातळीवर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीला बळ देण्यासाठी “ विशेष बाब ” म्हणून आमदार स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत निधीची मागणी करण्यात आली होती.

Google Ad

सन २०१९ -२० व २०२०-२१ अंतर्गत “ वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य ” खरेदी करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना रु . ५०.०० लक्ष मर्यादेपर्यंत निधी उपलब्ध करुन देण्यास शासन मान्यता देण्यात आली होती, हा निधी त्यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि औंध जिल्हा सामान्य रुग्णालयास दिला होता .

राज्यात “ कोव्हिड -१९ ” ( Covid – १९ ) विषाणुमूळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाची परिस्थिती अद्यापही आटोक्यात न आल्याने ती आटोक्यात आणण्याकरिता जिल्हास्तरावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही होण्याच्या दृष्टीने “ वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य ” खरेदी करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात कमाल रु . १००.०० लक्ष मर्यादेपर्यंत निधी उपलब्ध करुन देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे .

वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य यामध्ये ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर्स ( Oxygen Concentrators ) ऑक्सीजन सिलेंडर्स ( Oxygen Cylinders ) , व ऑक्सीजन रेग्युलेटर्स ( Oxygen Regulators ) , बायपॅप मशिन्स ( BIPAP Machines ) हॉस्पीटल बेडस् ( Hospital Beds ) तसेच आयसीयु बेडस् ( ICU Beds ) व्हायटल साईन मॉनिटर्स ( Vital Signs Monitors ) | एनआसीयु व्हेन्टीलेटर्स ( NICU Ventilators ) | स्ट्रेचर्स , ( Strachers ) पेशंट ट्रॉली , ( Patient Trolley ) इमरजन्सी ट्रॉली , ( Emergency Trolley फार्मासीटीकल फ्रिज ( Pharmaceutical Fridge ) व्हॅक्सीन बॉक्स , Vaccine Box ) “ कोव्हिड -१९ ” ( Covid १ ९ ) विषाणूच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक औषधे व साधनसामुग्री . ( Medicines & Drugs ) करीता हा निधी वापरण्यात येणार आहे.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता ” वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य “ खरेदीकरिता विधानमंडळ सदस्यांनी निधीची शिफारस केल्यास जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता दयावी व तदनंतर जिल्हास्तरीय कार्यान्वयीन यंत्रणाचे प्रमुख ( १ ) जिल्हा शल्य चिकित्सक ( District Civil Surgeon ) ( २ ) जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद ( District Health Officer , Zilla Parishad ) अथवा आवश्यकतेनुसार आयुक्त , महानगरपालिका ( Commissioner , Municipal Corporation ) व मुख्याधिकारी , नगरपालिका ( Chief Officer , Municipal Councils ) यांना काही अटींनुसार वैद्यकीय यंत्रसामुग्री , साहित्य व औषधे खरेदी करता येईल . असेही शासन परिपत्रकात म्हटले आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी “ कोविड -१९ काळात आणि इतरवेळीही आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधांबाबत व सार्वजनिक आरोग्य या गोष्टींचा पाठपुरावा करून शहरातील नागरिकांकरीता सोयीसुविधा उपलब्ध करून आरोग्यास प्राधान्य दिले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!