Google Ad
Uncategorized

यशस्वी एज्युकेशन  सोसायटीच्या  इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या व्यवस्थापन  शास्त्र  शाखेतील विद्यार्थी व प्राध्यापकांनी  पुणे  मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी  स्थानकाला  भेट 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक १ नोव्हेंबर २०२१) : यशस्वी एज्युकेशन  सोसायटीच्या  इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या व्यवस्थापन  शास्त्र  शाखेतील विद्यार्थी व प्राध्यापकांनी  पुणे  मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी  स्थानकाला  भेट दिली.

Google Ad

या भेटीत पुणे मेट्रोचे उप व्यवस्थापकीय  संचालक टी. मनोजकुमार डॅनियल यांनी आयआयएमएस च्या प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना पुणे मेट्रोच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती सांगितली. मेट्रो स्थानकावर प्रवाशांना कशा प्रकारच्या  सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत याविषयीसुद्धा  त्यांनी सविस्तर माहिती दिली.

पुणेकरांना  व उद्योगनगरी  पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना  पुणे मेट्रोचा भरपूर लाभ मिळणार असून त्यांचा दररोजचा प्रवास सुखकर व आरामदायक व्हावा यासाठी पुणे मेट्रो  कटिबद्ध आहे असे मत टी. मनोजकुमार डॅनियल यांनी यावेळी व्यक्त केले. मेट्रोमधून उतरल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी मेट्रो स्थानकावर ई  बाईक उपलब्ध करून देण्यात आल्याचेही  त्यांनी सांगितले. पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून  लवकरच प्रवाशांना पुणे मेट्रोचा  लाभ घेता येईल असे ते म्हणाले.

आगामी काळात शहरातील जीवनमान व दळणवळण  व्यवस्था आमूलाग्र बदलणार असून पुणे मेट्रोमुळे  विकासाला आणखी गती मिळेल, असे सांगत विद्यार्थ्यांना हा समाजरचनेवर प्रभावीरीत्या परिणाम करणारा  पुणे मेट्रोचा प्रकल्प समजावून घेता यावा  यासाठी पिंपरी स्थानकाला  भेट देण्याचे ठरले असे मत आयआयएमएस चे संचालक  डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!