Google Ad
Uncategorized

रील्स स्टार्सच्या रील स्पर्धेला नागरिकांचे लाखोंचे लाइक्स : तब्बल ३० लाखांच्यावर मिळाले व्ह्यूज ; :- कर संकलन विभागाच्या विक्रमात लोकसहभागाचा मोलाचा वाटा..

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.१७ एप्रिल) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता करवसुलीसाठी आजपर्यंत विविध उपक्रम राबविले. नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विभागाने होर्डिंग, पॅम्पलेट, रिक्षातून जनजागृती, सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन आदी आघाड्यांवर काम केले. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रील्स, मीम्स, व्हिडीओ यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात असून, त्याला सर्जनशीलतेची जोडसुद्धा मिळत आहे. नागरिकांमध्ये नव्या समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर पगडा निर्माण झालेला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील करदात्यांना कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी विभागाने सन २०२२-२३मध्ये मीम्स स्पर्धा आयोजित केली. त्यास सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर, विभागाने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ‘रील स्टार्स’ची ‘रील स्पर्धा’ आयोजित केली. त्या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शहरात कर भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती तसेच नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली.

Google Ad

: लोकसहभागातून विभागाने रचला कर संकलनाचा विक्रम…
मागील आर्थिक वर्षात विभागाने तब्बल ९७७ कोटींचा कर वसूल केला. नागरिकांनी वेळेत कर भरण्यासाठी विभागाने ‘एसएमएस अभियान’ राबवून नागरिकांना कायम सतर्क ठेवले. त्याचप्रमाणे रील स्पर्धेतील रील्समधून करण्यात आलेल्या आवाहनाच्या माध्यमातून नागरिकांना कॉमेडी, भावनिक संदेशामधून कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. यामुळेच नागरिकांच्या सहभागातून विभागाने कर संकलनाचा विक्रम रचला. ४२ वर्षांच्या पालिका इतिहासात पालिकेने प्रथमच ९७७ कोटींचा टप्पा पार केला.

: तब्बल ३० लाख लोकांपर्यंत पोहोचले रील स्पर्धेतील व्हिडीओ…
‘मिशीवर मारताय ताव आणि थकबाकीदारांच्या यादीत तुमचं पहिलं नाव?’, ‘तुझे थकबाकीदारांच्या यादीत नाव असेल तर मी लग्न करीत नाही’, ‘नळाचे गेले पाणी; घरावर आणीबाणी? तुमचीच होती जबाबदारी’ अशा आशयामुळे नागरिकांच्या मनात कर भरण्यासाठी असलेली अनास्था झटकून मोठ्या प्रमाणामध्ये कर भरण्यासाठी नागरिक पुढे सरसावले. स्पर्धेतील रील नागरिकांच्या पसंतीस उतरून तब्बल ३० लाख इतका प्रेक्षकवर्ग मिळाला. त्याचबरोबर स्पर्धेतील रील एक लाखाहून अधिक लोकांनी लाइक करून ३० हजारांवर नागरिकांनी ते शेअर केले.

 : हे आहेत स्पर्धेतील विजेते
कर संकलन विभागाच्या रील स्पर्धेसाठी तब्बल पन्नासहून अधिक रील स्टार्स यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये व्यावसायिक, वकील, शाळकरी मुले, नोकरदार सर्व स्तरातील रील स्टार्स यांनी सहभाग नोंदविल्याने स्पर्धेतील आशय नागरिकांपर्यंत पोहोचून शहरात कर भरण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले. त्यामधूनच आशय, व्हिडीओ निर्मिती, विषयाला अनुसरून मांडणी आदींचे निरीक्षण करून स्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले आहेत.
प्रथम क्रमांक : प्रकाश (पीयूष) मधुकर सजगणे
– द्वितीय क्रमांक : ज्योती भीमाशंकर सेतसंदी
– तृतीय क्रमांक : विष्णू धर्मा घासे
– चतुर्थ उत्तेजनार्थ क्रमांक : अस्लम रशीद शेख

कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. आता लोकांना पालिकेकडे येण्याची वेळ न येता पालिका लोकांपर्यंत कशी पोचेल याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही स्पर्धा घेण्यात आली. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आणि नागरिकांमध्ये कर भरण्याविषयक जागृती निर्माण झाली हे एक मोठे फलित आहे. कर संकलन विभागाच्या रील स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ज्या ज्या विभागात समाज माध्यमांची मदत घेता येईल तिथे तिथे अशी मदत घेतली जाणार आहे. त्यातून नागरिक आणि पालिका यात संवादाचे नवनवे पुल बांधता येतील असा विश्वास आहे. नागरिकांनी रिल स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांची पालिका अत्यंत आभारी आहे.
:- शेखर सिंह
आयुक्त
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा सुधारणे, यासाठी लोकांना सहभागी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कटू कारवाई करीत असताना आम्ही काही सकारात्मक पावले उचलली आहेत. रिल स्पर्धेत नागरिकांनी वापरलेल्या अनेक अभिनव कल्पना खरोखर दाद द्याव्यात अशा आहेत. कर वसुलीच्या शेवटच्या टप्प्यात त्यातून मोठ्या प्रमाणात जनजागृती घडून आली त्यामुळे कर संकलनाचा नवीन ऐतिहासिक टप्पा गाठता आला आहे.
:- प्रदीप जांभळे पाटील
अतिरिक्त आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिकापिंपरी चिंचवड पालिकेचा कर संकलन विभाग जन जागृती करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवनवे अभिनव उपक्रम राबवित आहे. मा. आयुक्त यांची व्हिजन आणि मा. अतिरिक्त आयुक्त यांचे मार्गदर्शन यातून या वर्षी सुद्धा शहरातील स्मारके, मानबिंदू यांच्याबद्दल स्केच स्पर्धा आणि नागरिकांचे विकासातील योगदान असा उपक्रम स्मार्ट सिटीच्या सहकार्याने हाती घेण्याचे प्रस्तावित आहे.
:- नीलेश देशमुख
सहायक आयुक्त
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!