Google Ad
Uncategorized

पिंपळे गुरव येथे ‘पै.कै. तुकाराम जवळकर’ यांच्या दशक्रिया विधीस होणार हभप श्रीमहंत पुरुषोत्तमदादा पाटील महाराज यांची प्रवचनरुपी सेवा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ एप्रिल) : पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर आणि पुरुषोत्तम जवळकर यांचे वडील व माजी नगरसेविका वैशालीताई जवळकर यांचे सासरे तसेच श्री गणेश सहकारी बँकेचे संचालक अंकुश अप्पा जवळकर यांचे चुलते तुकाराम पांडुरंग जवळकर यांचे सोमवारी दि. १५ एप्रिल रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. तुकाराम जवळकर यांचा पिंपळे गुरव गावातील सामाजिक कार्यात मोठा सहभाग असायचा, ते पंचक्रोशीतील पैलवान होते, त्यांना गावातील लोक ‘तात्या’ पैलवान या नावाने ओळखत होते, तात्यांच्या निधनाने पिंपळे गुरव, सांगवी परिसरातील त्यांचा मित्र परिवार व नातेवाईक तात्यांना पोरका झाला, लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप व शंकरभाऊ जगताप मित्र परिवार या सर्वांच्या वतीने तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

कै. तुकाराम जवळकर यांच्या मागे पत्नी, दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे, पुतण्या तानाजी (पिंटू) जवळकर असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि.१९ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वा. दशक्रिया विधी घाट, पिंपळे गुरव, पवना नदी काठी होणार आहे, यावेळी ह भ प श्रीमहंत पुरुषोत्तमदादा पाटील महाराज यांची प्रवचनरुपी सेवा होणार असल्याचे जवळकर कुटूंबीयांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!