Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड मधील प्रतिष्ठीत रहिवासी संस्था मॉन्ट व्हर्ट सेविले वाकड मध्ये … सुरक्षित भारत अभियान अंतर्गत फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखे मार्फत अग्निशमन कार्यशाळेचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० ऑक्टोबर) : सुरक्षित भारत अभियान अंतर्गत फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखे मार्फत आयोजित अग्णीसुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला होता.

फायर अँड सेक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्तरावर नामांकित संस्थेमार्फत आज दिनांक ३०.१०.२०२१ रोजी ४ वाजता पुणे शाखेने पिंपरी चिंचवड मधील प्रतिष्ठीत रहिवासी संस्था मॉन्ट व्हर्ट सेविले वाकड मध्ये अग्निशमन कार्यशाळेचे आयोजन केले होते या कार्यशाळेसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री किरण गावडे व अग्निशमन दलाचे तांत्रिक अधिकारी श्री चव्हाण, फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष(इव्हेंट अँड प्रोग्रॅम्स) श्री विरेंद्र बोराडे पुणे

Google Ad

शाखेचे अध्यक्ष नितीन जोशी सुकानु समितीचे सदस्य श्री अजित यादव, रिटायर्ड लेफ्टनंट गौतम सेलवाल ,तेजस्विनी ढोमसे अध्यक्ष पि. चि. हौसिंग फेडरेशन, श्री नंदकिशोर माटोडे मा.अध्यक्ष इशरे पुणे, यांनी या कार्यक्रमात मुख्य सहभाग घेतला या कार्यक्रमाची प्रस्तावना मॉन्ट व्हर्ट सेविले सोसायटीचे अध्यक्ष श्री गणेश ढोरे यांनी केली फायर अँड सेक्युरिटी असोसिएशन बद्दल केल्या जाणाऱ्या विविध उपाय योजना यांची माहिती श्री नितीन जोशी यांनी दिली.

निवृत्त लेफ्टनंट श्री गौतम सेलवाल यांनी उत्तम रित्या सर्व वयोगटातील रहिवाशांचे समोर अग्निशमन कार्यशाळेचे प्रात्यक्षिक व आगीपासून बचाव पद्धतीचे विस्तृत वर्णन केले.सर्व लहान मुलांना व ज्येष्ठांना आणि सुरक्षा रक्षकांना अग्निशमन उपकरण हाताळण्याचे प्रशिक्षण दिले, तसेच येणाऱ्या दिवाळी या उत्सवात आगीपासून बचाव आणि सुरक्षित दिवाळी कशी साजरी करावी याचे सुद्धा माहिती दिली सोसायटीचे सर्व सदस्य यांनी यावेळी उपस्थिती दाखवून कार्यशाळेचे योग्यरीत्या ज्ञानग्रहण केले. श्री अजित जाधव यांनी प्रश्न उत्तर तासांमध्ये विजेत्या लहान मुलं -ज्येष्ठ तसेच स्त्रियांना विविध पारितोषिक दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विरेंद्र बोराडे यांनी केले.

अग्निशमन अधिकारी श्री किरण गावडे यांनी शासन व महानगरपालिकेकडून केला जाणाऱ्या विविध उपाय योजना आणि अग्निशमन संबंधी कलम 2006 चे विस्तृत वर्णन केले त्यात त्यांनी सर्व नागरिकांना व पदाधिकाऱ्यांना सोसायटीमध्ये केला जाणाऱ्या विविध उपाययोजना बद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमाला यशस्वी करणे साठी कार्यक्रमाच्या संयोजिका सुजल शाह, सचिव अर्चना गव्हाणे, शशांक कुलकर्णी,अमोल उंबर्जे, अजय शंकर, अरीजित भट्टाचार्य, गणेश जोगदंडे, पिंपरी चिंचवड हौसिंग फेडरेशन तर्फे अध्यक्षा तेजस्विनी ताई ढोमसे,कोषाध्यक्ष श्री सचिन लोंढे व इतर सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

पिंपरी चिंचवड हौसिंग फेडरेशन तर्फे सदस्य असलेल्या सोसायटीचे पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते व त्यांनी कार्यक्रम योग्यरीत्या पार पडल्याचे समाधान व्यक्त केले.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!