Google Ad
Uncategorized

सांगवी नवी सांगवी-पिंपळे गुरव मधील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे दिव्यांनी उजळली … दिवाळी पाडव्याचा दीपोत्सव ठरला आनंदोत्सव!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ नोव्हेंबर) : दीपावली म्हणजे दिव्यांच्या प्रकाशाची पूजा आपल्या भारतीय सणातला वर्षातला हा सर्वांत मोठा दीपोत्सव. दिव्याची व्याख्या करायची तर असे म्हणता येईल की, जो स्वतः उजळून दुसऱ्यालाही प्रकाश देतो, अंधार दूर करतो तो दीपक म्हणून तर मानव या दीपाचा, तेजाचा पूजक बनला आहे.

दीप हा अग्नीचे, तेजाचे प्रतीक आहे. त्याच्यामुळे विजय प्राप्त होतो असं पुराण सांगतात. दिवा हा अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष देणारा आहे म्हणून प्रत्येक शुभप्रसंगी प्रथम दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात केली जाते. दीप हा आपल्या तेजाने एकटेपणाची, असहाय्यपणाची भावना, भीती दूर करून मन उत्साहित आशादायक बनवतो. शरद ऋतूच्या मध्यात म्हणजे आश्‍विन आणि कार्तिक या दोन महिन्यांच्या संधिकालात दिवाळी येते. हे चार दिवस सर्वत्र दिव्यांचा लखलखाट करत हा दीपोत्सव सुरू असतो. शहरात, खेड्यात श्रीमंतांच्या हवेलीत वा गरिबांच्या झोपडीत सारख्याच तेजाने तो उजळलेला असतो. श्रीमंतांच्या हवेलीत हंड्याझुंबरांत, छान नक्षीदार शामदानात तो प्रकाशतो तसाच गरिबांच्या झोपडीतल्या पणतीतही तो उजळतो. काम एकच अंधार दूर करणे.

Google Ad

दिवाळीच्या या संध्येला तिन्हीसांजेला घरीदारी सर्वत्र दिवे लागतात. घरात देवापुढे सांजवात लावून ‘शुभम करोती कल्याणम्‌’ ही दिव्याची प्रार्थना केली जाते. अशी ही प्रकाशज्योती आज आमदार ‘लक्ष्मण जगताप’ मित्र परिवाराच्या वतीने सांगवी, नवी सांगवी – पिंपळे गुरव मधील सर्वच धार्मिक स्थळांवर लावण्यात आली आणि सर्व धार्मिक स्थळे प्रकाशमय झाली होती . असेच दृश्य नवी सांगवीच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या शनी-मारुती मंदीरा समोर साकारले होते.

यावेळी सुनील कोकाटे, राजू नागणे, संदीप दरेकर, साई कोंढरे,चेतन तारू, अभिजित बागुल, प्रतीक भोसले, दिक्षा कवडे, नम्रता शिंदे, सोहम खंडिझोडे, शुभम चांद, अजिंक्य बोर्डे, अक्षय पाटील, आदित्य गावडे प्रसाद दरेकर,गौरव जोशी, पियुष यादव, साईश कोकाटे,शरद सूर्यवंशी,विशाल वलावंडे,सुजित चौधरी,रोहित शिरसाटं,रोहन गायकवाड,रोहन हरे,चेतन्य शिंदे,अथर्व शेटे, रोहन पाटील उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!