Google Ad
Editor Choice Pune

पुणे जि.प.च्या कमवा व शिका ‘ योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातील बारावी पास विद्याथ्यांसाठी कमवा आणि शिका योजना सुरू केली आहे .

कामावर आधारित पदवी हा सरकारी प्रशासनासोबतचा संपूर्ण देशातील पहिलाच प्रयोग असून नुकतीच त्याला समाजकल्याण आयुक्तांनी मान्यता दिली आहे . यामध्ये निवडकेलेल्या विद्यार्थ्यांच्या सोमवारी ( दि . ७ ) ऑनलाइन मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती समाजकल्याणच्या सभापती सारिका पानसरे यांनी दिली . समाजकल्याण विभागाकडून ७ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले होते . त्यातील ७७ अर्ज पात्र ठरले . १३ जुलै रोजी ही पात्रता परीक्षा होणार होती ; परंतु लॉकडाऊनमुळे ती २ ऑगस्टला घेण्यात आली .

Google Ad

त्यामध्ये आलेल्या ७७ अर्जदारांपैकी केवळ ४८ जण त्यात उत्तीर्ण झाले . मुलाखतीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखती ऑनलाइन पद्धतीने जिल्हा परिषदेतून घेतल्या जाणार आहेत . उमेदवाराला दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी हजर असणे आवश्यक आहे . या दिवशी आणि या वेळेत अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचा निवड प्रक्रियेकरिता विचार केला जाणार नसल्याचे पानसरे यांनी सांगितले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

54 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!