Google Ad
Editor Choice Maharashtra

मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल … आमदार ‘महेश लांडगे’ यांच्या पाठपुराव्याला यश!

महाराष्ट्र 14 न्यूज : भोसरी व्हीजन- २०२० ‘ अभियानाअंतर्गत आमदार महेश लांडगे यांनी मोशी येथे सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्र उभारण्याचा संकल्प केला होता . पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश आहे . याबाबत महेश लांडगे यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री जयकुमार रावल यांनी संबंधित विभागाची बैठक घेतली होती .

त्यानंतर निवडणूक आचारसंहिता आणि कोविड -१९ परिस्थितीमुळे या प्रकल्पाला गती मिळत नव्हती . त्यानंतर आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे , पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे , पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर , महाव्यवस्थापक आशुतोष सलील यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली .

Google Ad

पिंपरी – चिंचवडचे प्रतिनिधी म्हणून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर बाजू मांडली . आता संबंधित गायरान जमीन पिंपरी – चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तां तरीत करण्यात येणार आहे . मोशीत सफारी पार्क साकारण्यात येणार आहे . सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्राच्या कामाला गती मिळाली आहे. याचा भोसरी तसेच शहरातील लहान मुलांना आणि नागरिकांना लाभ होणार आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!