Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेच्या माध्यमातून प्रभाग क्र.३१ नवी सांगवी-पिंपळे गुरव मध्ये लोकांमध्ये जनजागृती … नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोविड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत . लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी. तसेच कोव्हीड १९ चा संसर्ग पसरु नये व झाला तर कोणती काळजी घ्यावी याची माहिती लोकांना मिळावी हा एकमेव उद्देश “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या योजनेचा आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि भा.ज.पा.शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली “माझे कुटंब माझी जबाबदारी” ह्या मोहिमेस आज प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी – पिंपळे गुरव येथे सुरुवात करण्यात आली .

या भागातील नगरसेवक अंबरनाथ कांबळे, नगरसेविका सौ माधवी राजापुरे , सिमाताई चौगुले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, भाजपचे प्रभाग ३१चे अध्यक्ष मारुती कवडे, भाजपचे सांगवी-काळेवाडी मंडल उपाध्यक्ष डॉ.देविदास शेलार, सुरेश शिंदे, चिटणीस भाऊसाहेब जाधव, श्रीकांत पवार, संजय गांधी निराधार योजना सदस्या अदिती निकम, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पवार, हनुमंत काकडे, रामदास पोखरकर, शरद ढोबळे, शिवाजी पवार, डोईफोडे सर मोहिमेतील स्वयंसेवक तसेच परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि भा.ज.पा.चे सर्व पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे . संपुर्ण पिंपरी चिंचवड शहरात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे .

Google Ad

संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत आपण आपल्या जीवनशैलीत बदल करणे महत्त्वाचे आहे . मास्कचा वापर करणे , शारीरिक अंतर राखणे , सॅनिटायझरचा वापर करणे यांसारख्या गोष्टी आपल्या वैयक्तिक , कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात स्वीकारण्याची गरज आहे . ‘ माझे कुटुंब , माझी जबाबदारी ‘ ह्या मोहिमेअंतर्गत कोरोना विषाणूवर संपूर्ण नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने संपूर्ण राज्यात ही मोहिम राबविण्यात येत आहे.

हि मोहिम लोकप्रतिनिधींच्या सहकायनि व नागरिकांच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने राबविण्यात येत असून प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी-पिंपळे गुरव मध्ये कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक लोकांना नवीन जीवनशैली आत्मसात करण्यास प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने या मोहिमेच्या अभियानास प्रारंभ करण्यात आला. कोविडच्या नियंत्रणासाठी प्रभावी आरोग्यसेवा शिक्षण मिळविणे हे सदर मोहिमेचे मुख्य उद्दीष्ट आहे .

सदर मोहिमेंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नेमलेले स्वयंसेवक त्या त्या क्षेत्रातील घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचे शारीरिक तापमान ऑक्सिजनची पातळी तपासनी करत आहेत. ह्या भेटीदरम्यान नागरिकांना आरोग्य सेवेबाबत महत्त्वाचा संदेश दिला जाईल आणि संशयित रुग्णांचा शोध घेण्यात येईल व उपचारासाठी रेफरल सेवेची अंमलबजावणी करण्यात येईल . या मोहिमेद्वारे मधुमेह इतर आजार ( उदा . मधुमेह , हृदयविकार , मूत्रपिंडाचा आजार , लठ्ठपणा इ . ) असलेल्या व्यक्तींना संदर्भित उपचार देखील देण्यात येतील .

मोहिमेदरम्यान स्वयंसेवक प्रत्येक कुटूंबास दोनदा भेट देतील , कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रभावीपणे रोखण्यासाठी , कुटुंबातील सर्व सदस्यांनी आवश्यक काळजी घेतली पाहिजे आणि अनवधानाने होणाऱ्या चुकादेखील टाळण्यासाठी जागरुक राहणे आवश्यक आहे . कोविंड -19 विरुद्धच्या या लढाईत सकारात्मक विजय मिळविण्यासाठी नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने कोणती महत्त्वाची पाऊले उचलायला हवीत याची माहिती दिली जाईल . तसेच वैयक्तिक , कौटुंबिक आणि सार्वत्रिक / सामाजिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याचा त्रिसूत्री दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे .

“माझे कुटंब माझी जबाबदारी” ह्या मोहिमेस प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी – पिंपळे गुरव येथील सर्व नागरिकांनी आपल्याकडे तपासणीसाठी येणाऱ्या स्वयंसेवकास सहकार्य तसेच कोरोनाच्या संबंधित कोणतीही अडचण आल्यास संपर्क करण्याचे आवाहन या भागातील नगरसेवक अंबरनाथ कांबळे, नगरसेविका सौ माधवी राजापुरे , सौ सिमाताई चौगुले यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!