Google Ad
Editor Choice Maharashtra

जेष्ठ भाजप नेते ‘एकनाथ खडसे’ धरणार राष्ट्रवादीची वाट?

महाराष्ट्र 14 न्यूज : भाजपमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून नाराज असणारे एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असणाऱ्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा होणार असून, त्याबाबतचा निर्णयही होणार असल्याचं म्हटलं जात आहे. जळगावमध्ये राष्ट्रवादीची कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी खडसेंपुढे प्रस्ताव मांडणं हे राष्ट्रवादीच्या दृष्टीनं फायद्याचं ठरु शकतं हेही महत्त्वाचे मानले जाते.

आजच्या घडीला जळगावमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत खुद्द शरद पवार आणि अजित पवार बैठक घेत आहेत. या बैठकीला जळगावमधील माजी आमदार गुलाबराव देवकर, सतीश पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील यांची उपस्थिती होती. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि खडसे या समीकरणात मीठाचा खडा पडला आहे. किंबहुना खुद्द खडसे यांनी कित्येकदा आपली नाराजी बोलूनही दाखवली आहे. इतकंच नव्हे, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत नाराजीचा सुर आळवल्याचंही पाहायला मिळालं आहे.

Google Ad

त्यामुळं ते अखेर पक्षातून काढता पाय घेणार का? याची उत्सुकता राजकीय मंडळींना लागून राहिली आहे. जवळपास ४५ वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये सक्रीय असलेले एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून भाजपवर नाराज आहेत. पक्ष नेतृत्वाकडून आपल्याला डावललं जात असल्याची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. त्यामुळं नाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार का? हे येत्या काळात दिसून येईल. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क रंगू लागले आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!