Google Ad
Editor Choice Maharashtra

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शरद पवार १९ आणि २० तारखेला करणार मराठवाड्याचा दौरा

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार १९ आणि २० तारखेला मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. ते तुळजापूर, उमरगा,औसा, परंडा ,उस्मानाबादमधील भागांना भेटी देतील. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजपासूनच बारामतीमधून आपल्या दौऱ्याला प्रारंभ केला आहे. यानंतर ते सोलापूर आणि इंदापूर परिसराची पाहणीही करणार आहेत. याशिवाय, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे कोकणात जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी जमिनीवर उतरून काम करायला सुरुवात केल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी दौरा करणार, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांना दिलासा मिळेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

Google Ad

परतीच्या पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वेळ पडल्यास सरकार कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करेल, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. त्यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही ठोस पावले उचलणार का, हे पाहावे लागेल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

60 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!