Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

प्रभागातील विकासकामाची आढावा बैठक … डांबरीकरण , रस्ते सुशोभीकरण , नवीन पेविंग ब्लॉक कामांना येणार गती – नगरसेविका ‘करुणा चिंचवडे’

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक १७ मधील सर्वच कॉलनीतील डांबरीकरण,पेविंगची कामे तातडीने हाती घ्यावीत, वाल्हेकरवाडी ते चिंचवड ३४.५० मीटर रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाइन नुसार सुशोभीकरण करणे,चिंतामणी मंदिर चौक ते स्पाईन रस्त्याच्या कडेने रस्त्याचे सुशोभीकरण,आदित्य बिर्ला चौकमधील सुलभ शौचालय पूर्ण करणे व सध्या चालू असलेल्या प्रभागातील विकासकामांना व चालू अवस्थेतील विकास प्रकल्पांना गती द्यावी.

तसेच लवकरात लवकर वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर,शिवनगरी, बीजलीनगर, दळवी नाागर भागातील स्थापत्य विषयक कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, या मागणीसह आज ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रतापसिंह पाटील यांच्या कक्षात प्रभाग क्रमांक १७ चे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Google Ad

या वेळी नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या समवेत सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, मोनाताई कुलकर्णी, स्थापत्य विभाग, ड्रेनेज विभाग, पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग मधील सर्वच अधिकारी उपस्थित होते.

यावेळी चर्चेनुसार प्रभागातील डांबरीकरणाची, नवीन पेविंग ब्लॉक बसविणे, पाणी पुरवठा सम प्रमाणात वितरित करणे या कामांना गती द्यावी असे ठरविण्यात आले लवकरच प्रभागातील सर्वच उपनगरात डांबरीकरण, नवीन ब्लॉक हि कामे लवकरच सुरु होणार आहेत, असे करुणा चिंचवडे यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

21 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!