Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुण्यात सेक्स रॅकेट सुरू असल्याचे उघड … वारजेतील लॉजमधून दोन मुलींची सुटका

महाराष्ट्र 14 न्यूज : मोठया विश्रांतीनंतर लॉज पुन्हा सुरू करण्यात आले त्याचा फायदा घेत अनलॉकनंतर पुणे शहरात सेक्स रॅकेट पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे . याप्रकरणी गुन्हे शाखेने पुणे – बंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे . त्या ठिकाणाहून दोन मुलींची सुटका करून तिघांना अटक करण्यात आली आहे . जितेंद्र उर्फ जितू बाबासाहेब नंदिरे ( वय 32 , रा . काळेवाडी ) , रामकिसन व्यंकट जाधव ( वय 35 , जनता वसाहत ) आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे . याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

लॉकडाऊनमुळे सेक्स रॅकेटला आळा बसला होता . मात्र , मागील काही दिवसांपासून अनलॉक करण्यात आल्यानंतर लॉजमध्ये अवैधरित्या व्यवसाय केला जात असल्याचे कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे . विविध भागात छुप्या पद्धतीने अवैध प्रकार सुरू असल्यामुळे गुन्हे शाखेची चिंता वाढली आहे . पुणे बंगळुरू महामार्गालगत वारजेतील एका लॉजमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलीस कर्मचारी संतोष भांडवलकर यांना मिळाली होती . त्यानुसार पोलिसांनी साई एक्झिक्युटिव्ह ‘ लॉजवर छापा टाकून दोन मुलींची सुटका केली . याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस अधिक तपास करीत आहे .

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

18 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!