Google Ad
Editor Choice Pune

Pune : Whatsapp कॉलवरून पुण्यातल्या एका महिलेला तब्बल २ लाखांचा गंडा … SBI मधून कॉल आला असल्याचं भासवल

महाराष्ट्र 14 न्यूज : आतापर्यंत फोन करून, तसंच ऑनलाइन देवाणघेवाणीमधून सायबर क्राईमच्या घटना आपण ऐकल्या असतील. परंतु आता whatsapp च्या माध्यमातून फसवणुकीची घटना पुण्यात घडली आहे. व्हॉट्स अॅप कॉलवरून अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. पुण्यातील महिलेला व्हॉट्सअपवरून कॉल आला आणि तिला 2.2 लाखांचा गंडा घातला. या महिलेचे SBI मध्ये खातं आहे. तिचं Sim card क्लोन करून फसवणूक करण्यात आल्याचं पोलिसांनी नंतर सांगितलं.

सिमचा वापर करून गैरप्रकार झाल्याचं लक्षात आल्यावर या महिलेनी बँक खातं ब्लॉक करण्याआधीच तिच्या खात्यामधून 2.2 लाख रुपये काढण्यात आले होते. अशा घटनांबद्दल ग्राहकांना जागरूक करण्यासाठी एसबीआयनी (SBI) पत्रक काढलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटरवर सायबर सिक्युरिटी अ‍ॅडव्हायझरी प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये सांगण्यात आले आहे की, SBI कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यासाठी फोन किंवा SMS करत नाही.

Google Ad

SBI ही भारतातली सर्वात मोठी आणि नावाजलेली बँक आहे. व्हॉट्स अॅपवरून एसबीआय ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार सतत घडत आहेत. फसवणूक करणारी टोळी एसबीआय ग्राहकांना व्हाट्स अॅप कॉल आणि मेसेज करून संपर्क करत आहे. एसबीआयतर्फे लॉटरी किंवा लकी ड्रॉमधून तुम्ही बक्षीस जिंकल्याची बतावणी करत आहे. त्यानंतर त्या ग्राहकांना एका बनावट फोन नंबरवर फोन करण्यास सांगतात आणि तो नंबर एसबीआयचा अधिकृत हॉटलाईनचा नंबर आहे असं सांगितलं जातं. ग्राहकानी तिथं फोन केल्यावर सिम क्लोनिंग करून खात्यातून पैसे काढता येतात.

या फसवणुकीसंदर्भात एसबीआयने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. एसबीआयने कोणतीही लॉटरी योजना किंवा भाग्यवान ग्राहक भेट असे कोणत्याही प्रकारची ऑफर सुरु केलेली नाही. कृपया असा फोन आणि मेसेजपासून सावध राहा! एसबीआय बँक कधीच इमेल, एसेमेस, कॉल किंवा व्हॉट्स अॅपवरून वैयक्तिक किंवा खात्याविषयी कोणतीच माहिती विचारत नाही.

बऱ्याच लोकांना अशाप्रकारच्या घोटाळ्यांची माहिती नसते किंवा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवून ते अशा गुन्हेगारांच्या फसवणुकीला बळी पडतात. कोणत्याही मोठमोठ्या कंपन्या व्हॉट्स अॅपवरून किंवा फोन करून त्यांच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नाही किंवा विचारात नाही. त्यामुळे अशा फसवणुकीला बळी पडू नका.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

15 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!