Google Ad
Editor Choice india

BREAKING NEWS : बाबरी विध्वंस खटल्याचा आज निकाल लागला … सर्व ३२ आरोपींची सबळ पूराव्याअभावी निर्दोष मुक्तता!

महाराष्ट्र 14 न्यूज : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीदीचा विध्वंस खटल्यात सीबीआय विशेष न्यायालयाने आज आपला निकाल जाहीर केला आहे. यासाठी सीबीआय न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. एकूण ४९ आरोपी होते. या आरोपींविरोधात सुनावणी झाली. ४९ आरोपींपैकी एकूण १७ आरोपींचा मृत्यू झाला आहे.

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारतीसारखे मोठे नेते आरोपी आहेत. लखनऊमध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष सीबीआय न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकले. साक्षी तपासल्या. १ सप्टेंबरला सुनावणी पूर्ण केली. २ सप्टेंबर पासून निकालाचे लिखाण सुरू केले. आणि आज बाबरीतील सर्व ३२ आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले.

Google Ad

बाबरी पडण्याचा कट हा पूर्वनियोजित न्हवता, साक्ष ठोस नाहीत असे लखनऊ विशेष ( CBI ) कोर्टाचे म्हणणे आहे.यामध्ये लालकृष्ण आडवाणी , मुरली मनोहर जोशी, महंत नृत्यगोपाल दास, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, रामविलास वेदांती, धरम दास, सतीश प्रधान, चंपत राय, पवनकुमार पांडेय, ब्रजभूषण सिंह, जयभगवान गोयल, महाराज स्वामी साक्षी, रामचंद्र खत्री, अमननाथ गोयल, संतोष दुबे, प्रकाश, शर्मा, जयभान सिंह पवेया, विनय कुमार राय, लल्लू सिंह, ओमप्रकाश पांडेय, कमलेश त्रिपाठी उर्फ सती दुबे, गांधी यादव, धर्मेंद्रसिंह गुर्जर, रामजी गुप्ता, विजयबहादुर सिंह, नवीनभाई शुक्ला, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीर कक्कड, रविंद्रनाथ श्रीवास्तव हे या खटल्यातील आरोपी होते. या सर्वांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

29 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!