Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सांगवीतील मधूबन भागातून नदीपात्रात सोडण्यात येत आहे मैला मिश्रीत सांडपाणी … दोषींवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष ‘प्रशांत शितोळे’ यांनी केली मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सांगवी या ठिकाणी मुळा नदी लगत असलेल्या मलनिस्सारण पाईप लाईन मधून गेली अनेक दिवस मुळा नदी मध्ये थेट पाणी सोडले जात असून या गंभीर अवस्थेकडे महानगर पालिका प्रशासनाचे लक्ष नाही व याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी नितीन शिंदे विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे.

सांगवी भागामध्ये मधुबन या ठिकाणी मुळा नदीचे पात्र असून लगतच संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे, याच संरक्षण भिंतीच्या आडून सांगवी भागातला मैला व सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत सिमेंटची पाईप लाईन असून यावर कोणाचेही लक्ष नसल्याने या लाईन मधून थेट नदीपात्रात सांडपाणी येत असल्याने मुळा नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे सांगवी भागात सध्या डासांचे प्रमाण वाढले आहे व नागरिकांच्या आरोग्यास देखील यामुळे धोका संभवत आहे. त्यामुळे अनेक रोगराईचे आजारास निमंत्रण देण्याचाच हा प्रकार आहे.

Google Ad

काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाने अशा प्रकारेच पर्यावरणास हानी होत असलेल्या कामाबाबत दंड ठोठावला आहे. तरीदेखील नागरिकांच्या जिवाची पर्वा न करता दुर्लक्ष करून महानगरपालिका त्याच पद्धतीची प्रदूषित परिस्थिती ठेवत आहे हे प्रशांत शितोळे यांनी लक्षात आणून दिले आहे.

या निवेदनात प्रशांत शितोळे यांनी म्हटले आहे, की आपल्या विभागाकडून या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून कोणाच्या चुकीमुळे नदीपात्रात सांडपाणी व मैला पाणी सोडण्यात येते, याबाबतची चौकशी व्हावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी म्हणून आपणास या पत्राद्वारे तक्रार करीत असून आपण तातडीने त्याची दखल घ्यावी.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!