Google Ad
Editor Choice india

Delhi : ‘ राजकारणी जाड कातडीचे , जनावरांची सुई वापरणार आहात का ? … ‘ मोदींना लस टोचता टोचता नर्स खुदूखुदू हसली

महाराष्ट्र 14 न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (1 मार्च) सकाळी लवकर साडेसहा वाजताच राजधानी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) येथे येऊन कोरोनाची लस घेतली. दरम्यान पंतप्रधानांना लसीकरण देण्यासाठी दोन नर्सेसची नियुक्ती करण्यात आली होती. मोदी आल्यानंतर लस देत असताना मोदींनी नर्सेला असं काही म्हटलं की नर्सेसलाही हसू आवरले नाही. राजकारणी जाड कातडीचे असतात त्यामुळे तुम्ही मला लस देण्यासाठी वेगळी सुई वापरणार का? अशी विचारणा मोदींनी करत उपस्थितांमध्ये हशा पिकवला .

पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आज सकाळी कामकाजाच्या वेळेआधी सकाळी लवकर साडेसहा वाजताच एम्समध्ये जाऊन लस घेतली. यावेळी त्यांनी लस देणाऱ्या नर्सेसच्या चेहऱ्यावरील तणाव पाहत त्यांच्यासोबत हलकाफुलका संवाद सुरु केला. त्याचाच भाग म्हणून त्यांनी राजकारण्यांवर विनोद केला. राजकारण्यांवर नेहमीच टीका होत असते की मागणी करुनही राजकारणी, नेते निर्णय घेत नाहीत. ते ‘गेंड्याच्या कातड्याचे’ असतात. हाच धागा पकडत मोदींनी नर्सेला हसवले.🔴आरोग्य कर्मचाऱ्यांना सहजपणा यावा म्हणून विनोदाचा उपयोग

Google Ad

एम्समध्ये देशाचे पंतप्रधान कोरोना लसीकरण करण्यासाठी येणार असल्याने रुग्णालयाची संपूर्ण यंत्रणा सतर्क होती. त्यामुळेच मोदी सकाळी येण्याआधीपासूनच रुग्णालयातील नर्सेस काहीशा तणावात हजर होत्या. हे मोदींच्या लक्षात आलं. त्यांनी तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलायला सुरुवात केली. तसेच नर्सेलाल हसवण्यासाठी त्यांनी राजकारण्यांवरच विनोद केला.

💉“राजकारण्यांची कातडी जाड असल्याने जनावरांची सुई तर वापरणार नाही ना?

स्वतः पंतप्रधान मोदींनीच अशापद्धतीने राजकारण्यांवर शेरेबाजी करत विनोद केल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. असं असलं तरी सुरुवातीला मोदींच्या प्रतिक्रियेने काही क्षण कर्मचारी गोंधळे. त्यांना मोदी काय म्हणत आहेत हे लक्षात आलं नाही. पण नंतर स्वतः मोदींनीच मी राजकारणी आहे आणि राजकारण्यांची कातडी जाड असल्याने तुम्ही माझ्यासाठी दुसरी जनावरांची सुई तर वापरणार नाही ना? असं विचारलं. यानंतर नर्सेसलाही हसू आवरलं नाही.

मोदी नेमकं काय म्हणाले?
मोदी म्हणाले,
“राजकारण्यांची ओळख जाड कातडीचे अशी असते. त्यामुळे तुम्ही मला लस देताना जनावरांसाठीची सुई तर वापरणार आहत का?”

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!