Google Ad
Editor Choice Maharashtra

Shirdi : शिर्डीच्या साई संस्थानचे भाविकांना आवाहन … दर्शनासाठी पारंपरिक हिंदुस्थानी पेहरावात यावे!

महाराष्ट्र 14 न्यूज : श्री साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येताना भाविकांनी पारंपरिक हिंदुस्थानी पेहरावातच यावे, असे आवाहन साईबाबा संस्थानने केले आहे. याबाबत मंदिर परिसरात संस्थानच्या वतीने तसे फलक लावण्यात आले आहेत. साई संस्थानच्या या निर्णयामुळे महिला भाविकांची अनेक दिवसांची मागणी पूर्णत्वास येत आहे. काही नागरिक धार्मिक स्थळीही पर्यटन स्थळ म्हणूनच वावरतात. तिथेही तोकडय़ा कपडय़ांमध्ये येतात.

त्यामुळे तेथील पावित्र्य, शांतता धोक्यात येते तसेच भाविकांच्या भावनाही दुखावल्या जातात. यामुळे मंदिर परिसरात येताना भाविकांनी हिंदुस्थानी पेहरावात यावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होती. वेशभूषेबाबत काही भाविकांनी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने आम्ही भाविकांना दर्शनासाठी पारंपरिक हिंदुस्थानी वेशभूषेत यावे, असे आवाहन केले आहे. ड्रेसकोडची सक्ती केली नाही. – कान्हुराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान, शिर्डी

Google Ad

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!