Google Ad
Editor Choice Technology

Dilhi : दिलासादाय खूशखबर ! कोरोनाच्या पहिल्या लशीला मंजुरी … पुढील आठवड्यात या देशात होणार उपलब्ध

महाराष्ट्र 14 न्यूज : व्यापक वापरासाठी फायझर-बायोएनटेक (Pfizer/BioNTech) कोरोना व्हायरस लस मंजूर करणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरला आहे. अमेरिकी फार्मा कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेक यांच्या संयुक्त प्रयत्नाने तयार करण्यात आलेल्या या कोरोना व्हायरस लशीला (Coronavirus Vaccine) ब्रिटनमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात ब्रिटनमधील लोकांना ही लस दिली जाणार आहे.

ब्रिटन सरकारने असे म्हटले आहे की, स्वतंत्र औषध आणि आरोग्य सेवा नियामक एजन्सी ‘एमएचआरए’ची शिफारस स्वीकार करत सरकारने फायझर-बायोएनटेक च्या कोव्हिड-19 (COVID-19) व्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे. संपूर्ण युकेमध्ये पुढील आठवड्यापासून ही लस उपलब्ध होणार आहे.

Google Ad

MHRA ने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, कोव्हिड-19 बाबत 95 टक्के सुरक्षा देणारी ही लस पुढील आठवड्यात रोलआउट करणं सुरक्षित आहे. केअर होममधील वृद्ध नागरिकांना लशीची जास्त गरज आहे, अशा ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांच्यासाठी लसीकरण काही दिवसातच सुरू होऊ शकतं.


दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी देखील या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करून असं म्हटलं आहे की, ‘हे विलक्षण आहे की,कोव्हिड -19 साठी एमएचआरएने औपचारिकपणे फायझर-बायोएनटेकचे व्हॅक्सिन अधिकृत केले आहे. पुढील आठवड्यापासून ही लस संपूर्ण युकेमध्ये उपलब्ध करण्यास सुरवात होईल.’

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!