Google Ad
Editor Choice Pune District

Khed : राजगुरूनगरमध्ये खेड पोलिसांनी केली, विना मास्क फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या २० जणांवर कारवाई!

महाराष्ट्र 14 न्यूज : राजगुरूनगरशहरात करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खेड पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. दंड न भरणाऱ्या नागरिकांवर खटला दाखल करण्यात येत आहे. खेड न्यायालयाने तीन जणांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांनी दिली.

खेड पोलिसांच्या वतीने शहरात सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई सुरुवात केली आहे. विनामास्क फिरणाऱ्या तीन व्यक्तींवर खटले दाखल केले होते. दिवसभरात 20 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Google Ad

पोलीस निरीक्षक सतीश गुरव मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार एस. एल. बागल, एस. सी. भोईर, एच. बी. मडके, एस. एन. घोडे, एस. बी. भवारी, एस. डी. शिंदे, होमगार्ड होले, वारे, सावंत झरे यांनी कारवाईत केली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

95 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!