Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

राहटणी गावचा सन्मान वाढविणाऱ्या राजू हिप्परकर , ऋतिक नखाते आणि धनंजय कोकणे … या गुणवंतांचा ‘नगरसेविका सविता खुळे’ यांच्या वतीने सत्कार!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.२६ फेब्रुवारी ) : उत्कृष्ठ खेळाडू पुरस्कार मिळालेले राजू हिप्परकर तसेच ऋतिक संजय नखाते यांची ५७ किलो गटातून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल आणि ॲड. धनंजय कोकणे यांची पिंपरी चिंचवड बार असोसिएशनच्या ऑडीटरपदी निवड झाल्याबद्दल नगरसेविका सविता खुळे व नरेश आप्पा खुळे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धेची निवड चाचणी रहाटणी येथे घेण्यात आली. कोरोनाच्या परिस्थिमुळे यावेळी प्रथमच प्रेक्षकाविना हि निवड चाचणी पार पडली. यावेळी उत्कृष्ठ खेळाडू पुरस्कार राजू हिप्परकर यांना देण्यात आला. ५७ किलो वजनी गटातून रहाटणीचा ऋतिक संजय नखाते यांची निवड झाली.

Google Ad

हे दोघेही महाराष्ट्र युवा केसरी किशोर नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. तसेच रहाटणीचे ॲड. धनंजय कोकणे यांची पिंपरी चिंचवड बार असोसिएशनच्या ऑडीटरपदी भरघोस मतांनी निवड झाली. या तिघांमुळे रहाटणी गावाचा सन्मान वाढला असल्याची भावना व्यक्त करत नगरसेविका साविताताई खुळे व नरेश आप्पा खुळे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

20 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!