Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत ‘ निर्णय … वाचा, काय झाला निर्णय

महाराष्ट्र 14 न्यूज : वनमंत्री संजय राठोड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक संपली आहे. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे.

संजय राठोड यांनी आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेले फोटो, ऑडिओ क्लिप्स आणि काही व्हिडिओ सर्वांसमोर आल्यांतर त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. या कारणामुळे मागील कित्येक दिवसांपासून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजपने लावून धरली होती. वनमंत्री संजय राठोड राजीनामा दिला आहे. पण, पोहरादेवी मंदिराच्या महंत जितेंद्र महाराज यांनी विरोध केला आहे. तसंच, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तर आमदारकीचा राजीनामा देण्यास भाग पाडू असा इशाराही दिला आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

71 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!