Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

काळेवाडी तील मोबाइल शॉपमध्ये घुसून कोयत्याने मारहाण करणाऱ्या फरार आरोपींचा … सीसी टीव्ही फुटेजवरून क्राइम युनिट ४ पोलिसांनी लावला शोध!

महाराष्ट्र 14 न्यूज : दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी ०३:३० वा दरम्यान अजय शर्मा यांचे छत्रपती चौक काळेवाडी येथील मोबाईल शॉप मध्ये ३ अनोळखी इसम यांनी घुसून फिर्यादी यांना कोयत्याने मारहाण करून दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली होती. त्यांचे संदर्भात अजय शर्मा यांनी वाकड पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखा, युनिट ४ कडील अधिकारी पोलिस हवालदार नारायण जाधव, पोलिस शिपाई पांढरे, पोलिस शिपाई चव्हाण, पोलिस शिपाई गुट्टे यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपी येण्या जाण्याचा मार्ग निश्चित करून आरोपींनी वापरलेले वाहन शोधून काढले.

Google Ad

त्यावरून पुढे सदरचा गुन्हा हा आरोपी अभयजित अजय सिंह वय १९ वर्षे रा.नढे नगर, काळेवाडी, ऋषिकेश शाम कुडवे वय २३ वर्षे रा. तपकीर मळा काळेवाडी व आरोपी पंकज सिंह वय २२ वर्षे रा.नढे नगर यांनी केल्याचे निष्पन्न करून आज रोजी यातील आरोपी अभयजित सिंह व ऋषीकेश कुडवे या दोघांना ताब्यात घेऊन सदर चा गुन्हा उघड केला आहे.

ताब्यातील २ आरोपींना दाखल गुन्ह्याचे पुढील तपास कामी वाकड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत आहे. ही कारवाई प्रसाद गोकुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ४ पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!