Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

वाकड हद्दित स्पा वर छापा , मसाज चे नावा खाली सुरु होता वेश्याव्यवसाय … ०५ पिडीत तरुणींची सुटका व ०३ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश पिपरी – चिंचवड यांनी अवैद्ध धंदयाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयात ” झिरो टॉलरन्स ” मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते . त्या अनुशंगाने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना अवैद्ध धंद्यांवर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते .

दि . ०१ मार्च २०२१ रोजी गुन्हे शाखा युनिट -४ , पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांना माहिती मिळाली की , फॉरेव्हर स्पा झोन स्किन केअर , क्युब रामा ग्रुप सोसायटी , दत्त मंदिर , तिसरा मजला , वाकड , पुणे या स्पावर काही तरुणींकडुन जबरदस्तीने मसाजचे नावाखाली वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात आहे . सदर बातमीचे अनुषंगाने वरिष्ठांशी चर्चा करुन सापळा कारवाईचे नियोजन करण्यात आले, व एका बनावट ग्राहकास सदर ठिकाणी पाठवुन खात्री झाल्यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी स्वतः ,सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख व स्टाफ सह सदर स्पावर छापा घातला असता त्याठिकाणी एकुण ०५ तरुणींना डांबुन ठेवले असल्याचे आदळून आले.

सदर स्पाची मालक व मॅनेजर महिला ज्योती राहुल नायडु , वय -४५ वर्षे , रा- साहील हाईटस , पाचपीर चौक , काळेवाडी , वाकड , पुणे व तिचे भागीदार विशाल पवनकुमार अग्रवाल रा.मोहन नगर , चिंचवड , पुणे आणि आबासाहेब भाऊसाहेब तागड , रा – तागड हाऊस , अनंत पार्क , सर्वे नंबर -४४ , ए ३ काटे पुरम चौक जवळ , पिंपळे गुरव , पुणे . हे मागिल २-३ महिन्या पासुन सदर स्पा मध्ये पिडीत मुलींकडुन जबरदस्तीने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी बॉडी मसाजचे नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय करवुन घेत असल्याचे निष्पन्न झाले . सदर महिलांकडुन वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची खात्री झाल्याने सदर महीलांची त्यांच्या तावडीतुन सुटका करुन त्यांना सुरक्षितते कामी ताब्यात घेवुन संरक्षणकामी रेस्क्यु फौंडेशन , संरक्षण गृह , मोहम्मदवाडी , पुणे येथे ठेवले आहे . सदर महिला आरोपी व तिचे इतर ०२ भागीदार यांचे विरुद्ध वाकड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर महिला आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास वाकड पोलीस ठाणे करत आहे .

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!