Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

खुनाचा प्रयत्न व खंडणी सारखा गंभीर गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस … पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील गुन्हे शाखा युनिट ०२ च्या पथकाने केले जेरबंद!

महाराष्ट्र 14 न्यूज : दिनांक ०१ मार्च २०२१ रोजी रात्रौ गुन्हे शाखा युनिट ०२ पिंपरी – चिंचवड कढील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयातील टॉप २५ , तडीपार , पाहिजे / फरारी यांचा शोध घेत निगडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना , पोलीस हवालदार ८३२ जयवंत राऊत यांना त्यांच्या बातमीव्दारा मार्फत माहिती मिळाली की , आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हयातील आरोपी कुणाल ऊर्फ बाबा धिरज ठाकुर वय २० वर्षे रा . ५३७ रविवार पेठ , ब्राम्हण आळी , तळेगाव दाभाडे .

हा तेथे येणार असल्याची बातमी मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट ०२ कडील पोलीस हवा . २५३ दिपक खरात , पोलीस ४४३ प्रमोद वेताळ , पोलीस हवा . ८३२ जयवंत राऊत , पोलीस नाईक १०२३ जमीर तांबोळी यांच्या पथकाने सापळा रचुन त्यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे चौकशी करुन तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनशी संपर्क साधुन त्यांच्या कडुन अधिक माहिती घेतली असता तो सदर गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करुन रिपोर्टसह पुढिल कारवाईकामी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे .

Google Ad

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश , अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री सुधीर हिरेमठ , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट २ चे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड , पोलीस उप निरीक्षक संजय निलपत्रेवार , पोलीस अंमलदार जयवंत राऊत , दिपक खरात , प्रमोद वेताळ , जमीर तांबोळी , शिवानंद स्वामी , केराप्पा माने , वसंत खोमणे , महिला पोलीस अंमलदार उषा दळे , पोलीस अंमलदार अजित सानप , नामदेव कापसे , आतिष कुडके , शिवाजी मुंढे यांचे पथकाने केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!