Google Ad
Editor Choice Pune

Pune : ‘कोणी बेड देतंय का बेड’ … कोरोनाच्या प्रादुर्भावात बेडसाठी रुग्णांची ससेहोलपट व नातेवाईकांना मनस्थाप!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्याच सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. अशातच अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः लॉकडाऊन, तर काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्याता आली आहे. अशातच पिंपरी चिंचवड आणि पुण्यातही कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. अशातच दोन्ही शहरात अपुऱ्या वैद्यकीय सुविधांचा पुन्हा एकदा नागरिकांना सानमा करावा लागत आहे. पिंपरी चिंचवड आणि पुण्यात कोरोना रुग्णांसाठी कोणी बेड देतं का बेड? अशी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

यापूर्वीही दोन्ही शहरात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट पाहायला मिळाला होता. अशातच त्यावेळीही उपचारासाठी बेड मिळवताना रुग्णांची ससेहोलपट होत असल्याचं पाहायला मिळत होत. तसेच अनेक कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर बेड मिळू न शकल्यानं उपचारांअभावी जीवही गमवावा लागला होता.

Google Ad

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल (रविवारी) एकाच दिवसांत पुण्यात जवळपास 4 हजारांहून अधिक व पिंपरी चिंचवड मध्ये 2275 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अनेक रुग्णांना बेड मिळवण्यासाठी ससेहोलपट करावी लागत आहे. शहरातल्या प्रमुख रुग्णालयांमधील तर जवळपास सर्वच प्रकारचे बेड भरले आहेत.

पुण्यातील रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागल्यानंतर पुण्यातील खाजगी रुग्णालयांमधील 50 टक्के बेड प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात येतील असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं होतं. परंतु, त्यानंतरही खाजगी रुग्णालयांनी दाद न दिल्यानं हे बेड आरोग्य यंत्रणेच्या ताब्यात आलेले नाहीत. तर कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत? याची माहिती देणारा डॅशबोर्डही गेल्या कित्येक दिवसांत अपडेट करण्यात आलेला नाही. त्यामुळे रुग्णांना बेड मिळणं आणखी अवघड झालं आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

78 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!