Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुण्याच्या महापौरांनी काय आवाहन केलं आहे? … पुण्यावर नव्या कोरोना विषुणूचे संकट?

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यात याआधी कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरला होता. दुसऱ्या लाटेतही आधीसारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणून शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. ‘आपणा सर्वांना ज्ञात आहेच की कोरोना व्हायरस हा नवीन रुपात येवून आपल्या समोर नवीन आव्हान घेऊन आला आहे. याचा पुढे प्रसार होऊ नये यासाठी आपण सर्वांनी एकत्र येवून याला लढा देणे आवश्यक आहे.

सद्यस्थितीत प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पहिली पायरी म्हणून लंडन किंवा युरोपियन देशांमधून पुण्यात आलेल्या यात्रेकरूंना शोधून त्यांची आर टी पी सी आर चाचणी करून पुढील कार्यवाही करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. मी 25 नोव्हेंबर नंतर पुणे शहरात लंडन किंवा युरोपियन देश येथून आलेल्या आणि आमच्या आरोग्य विभागाने संपर्क न केलेल्या अशा सर्व लोकांना आवाहन करतो की आपण अती त्वरीत नजीकच्या महापालिका आरोग्य केंद्रात संपर्क करून आपली आर टी पी सी आर चाचणी करून घ्यावी आणि पुढील उपाय योजना राबविण्यास प्रशासनास सहकार्य करावे,’ असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. हा नवा विषाणू आधीपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं सांगितलं जातं. याच इंग्लंडमधून पुण्यात आलेल्या प्रवाशांपैकी पुन्हा एकदा 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. दुसरीकडे, इंग्लंडमधून पुण्यात परत आलेल्यांची संख्या 638 वर पोहोचली आहे. मात्र त्यातील 106 जणांचा पत्ताच सापडत नसल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत आरोग्य विभागाने पुणे पोलिसांना तपासासाठी पत्र दिलं आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!