Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुण्यात पावसाचा कहर … रस्ते उखडले , घरं भरली , कोविड रुग्णालयातही पाणी तुंबलं!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.१५ ऑक्टोबर ) : राज्यभरात तुफान हाहाकार उडवल्यानंतर आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पुण्यातही रात्री पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले. पुण्याला काल संध्याकाळपासून पावसाने झोडपून काढले. पुण्यात आता पाऊस थांबला आहे. मात्र या पावासाची दाहकता दाखवणारी दृश्ये आता समोर येत आहेत.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोथरुडमध्ये नुकसानीची पाहणी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कात्रज भागात जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. पुण्यात कर्वेरोडवरच्या नेहरु वस्तीमधील काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं. आता वस्तीमधलं पाणी ओसरलं आहे. पण प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे.

Google Ad

याशिवाय काही कोव्हिड सेंटरमध्येदेखील पाणी शिरल्याने प्रशासनासह रुग्णांचीही तारांबळ उडाली. तिकडे सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. रस्त्यावर इतकं पाणी साचलं होतं की त्यामुळे अनेक वाहने जागच्या जागी बंद पडली. जिकडे तिकडे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!