Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दिलासादायक : पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स – शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि.१६ ऑक्टोबर २०२० ) रोजी २३३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील २२८ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ५ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर ४७२ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Google Ad

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे _०३ पुरुष_ – चिंचवड (७५ वर्षे), पिंपरी (७२ वर्षे), भोसरी (४२ वर्षे) _०४ स्त्री_ – सांगवी (६० वर्षे, ६१ वर्षे), थेरगाव ( ५५ वर्षे), काळेवाडी (५० वर्षे) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे _०४ पुरुष_ – आळंदी (६२ वर्षे), जुन्नर (५७ वर्षे, ६५ वर्षे), शेंडेवाडी (६० वर्षे) _०१ स्त्री_ – शिवाजीनगर (६२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.


माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिम (दुसरा टप्पा) अंतर्गत आज अखेर १३१४ पथकांव्दारे ३१५४५९ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये ३३६ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता ३६ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.

पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त मास्क जवळ बाळगावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

70 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!