Google Ad
Editor Choice Pune

Pune : काळजी घेणारे पोलिस ‘मामा’

महाराष्ट्र 14 न्यूज : , ती मूळची सातारची . पुण्यात चुलत बहिणीकडे रहायला आलेली . पण अचानक सुरू झालेल्या कडक लॉकडाऊनमुळे तिला मुक्काम वाढवावा लागला . त्यात तिचे आणि त्या बहिणीचे भांडण झाले . तिने पुणे सोडून सातारला परतण्याचा निर्णय घेतला व ती घराबाहेर पडली . पण लॉकडाऊनमुळे जाणे अवघड आहे हे समजताच तिने वारजे पो . स्टेशनला फोन केला . त्यावेळी ड्यूटीवर असलेले व.पो.नि. कदम साहेबांनी तिची परिस्थिती समजून घेतली आणि आपले सहकारी हे.कॉ. संतोष भापकर यांच्याकडे तिची जबाबदारी सोपविली .

भापकर तिच्याशी बोलले आणि तिच्या भावाशीही त्यांनी संपर्क साधला . परिस्थितीचं गांभीर्य समजून कदम साहेबांनी त्या रात्री तिची व्यवस्था हॉस्टेलवर करण्यास सांगितले . भापकरांनी कमिन्स गर्ल्स हॉस्टेलशी संपर्क साधून त्यांना विनंती केली आणि ती एक रात्र ती मुलगी हॉस्टेलवर सुरक्षित राहिली . दुसर्या दिवशी तिच्या दोन मैत्रिणी आल्या आणि तिला आपल्या घरी घेऊन गेल्या . या घटनेनंतर पंधरा दिवसांनी त्या मुलीने भापकरांना फोन करून त्यांचे आभार मानले . या घटनेत पोलीसांनी मामाची भूमिका योग्यपणे पार पाडून आपल्या भाचीला सुरक्षित ठेवले .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!