Google Ad
Editor Choice Maharashtra

Nagpur : भिऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत … कोण आहे? तुकाराम मुंढे च्या पाठिशी!

महाराष्ट्र 14 न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचं समर्थन केलं आहे “आम्ही सरकार म्हणून तुकाराम मुंढे आणि संपूर्ण प्रशासनाच्या पाठीशी उभे आहोत”, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरानाची परिस्थिती वाढत असताना काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी यांच्यात प्रचंड संघर्ष बघायला मिळाला होता. संदीप जोशी यांनी मुंढेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या संघर्षाची राज्यभर चर्चा झाली. मात्र, या संघर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांचं समर्थन केलं होतं. त्यापाठोपाठ आज बाळासाहेब थोरात यांनी तुकाराम मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं आहे.

Google Ad

नागपुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज  ३ ऑगस्ट रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “नागपूरच्या आजच्या बैठकीला सर्वांना बोलावलं होतं. नागपूरच्या स्थितीबाबत भविष्याचा विचार करुन नियोजन करत आहोत”, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!