Google Ad
Editor Choice Pune

Pune : पोलिस उपायुक्त यांनीच केली, पैसे उकळणाऱ्या पोलिसाला पाच हजार रुपये दंडाची शिक्षा!

महाराष्ट्र 14 न्यूज : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरटीओमध्ये जाऊन दंड भरावा लागेल , अशी भीती दाखवत वाहनचालकाकडून अडीच हजार रुपये उकळणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसाला पाच हजार रुपये दंड करण्यात आला आहे . संबंधित पोलिसाने शिस्तभंग करून वाहतूक पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याने त्याला ही शिक्षा देण्यात आली आले. सहायक पोलिस फौजदार प्रकाश बाबूराव दौंडकर असे दंड झालेल्या पोलिसांचे नाव आहे .

वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांनी ही शिक्षा सुनावली . दौंडकर हे विमानतळ वाहतूक विभागात नेमणूक होती, ते वाहनांवर कारवाई करणाऱ्या टेंपोवर ऑपरेटर म्हणून होते . सहा फेब्रुवारी रोजी त्यांनी रजत यांचे वाहन टो केले होते . रजत जोहरी हे गाडी सोडविण्यासाठी दौंडकर यांच्याकडे गेला . तेव्हा त्यांनी वाहन जप्त करण्याची व आरटीओकडे जाऊन दंड भरावा लागेल , अशी भीती जोहरी यांना दाखविली . त्यानंतर टेंपोचालक संजय बनसोडे व हेल्पर धर्मा यांच्याकडे निर्देश करून त्यांच्यामार्फत पैशांची मागणी केली .

Google Ad

त्यावेळी गाडीमालकाकडून अडीच हजार रुपये घेतले होते . याबाबत दाखल तक्रारीची पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानुवरु यांनी चौकशी केली . त्यात दौंडकर यांनी पैसे घेतल्याचे आढळून आले . त्यानंतर दौंडकर यांना पाच हजार रुपये दंड का आकारू नये म्हणून नोटीस देण्यात आली. त्यांनी समाधानकारक खुलासा न केल्याने, त्यांना पोलिसांची प्रतिमा मलिन करणारे वर्तन केल्याप्रकरणी दौंडकर यांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!