Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

रामजन्मभूमी भूमीपूजन कार्यक्रमानिमित्ताने भाजपच्या कार्यालयात आनंदोत्सव … महाआरती, लाडू वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज,ता . ५ : मंदिराला फुलांची सजावट , घरासमोर रांगोळी , दिवे प्रज्वलित करून पेढे , लाडू वाटप करीत फटाके फोडून अयोध्येतील रामजन्मभूमीच्या मंदिर भूमिपूजनाचा आनंदोत्सव शहरात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला . शहरात यामुळे उत्साहाचे वातावरण होते . कोरोनामुळे एकत्रित येत कार्यक्रम सार्वजनिकरीत्या करण्यास मनाई आहे . त्यामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम घरातच टीव्हीवर ‘ लाइव्ह ‘ पहावा असे आवाहनही करण्यात आले होते . अनेकांनी घरातूनच प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन घेत ‘ जय श्री राम ‘ चा जयघोष करीत आनंदोत्सव साजरा केला.

तर शहरात भाजपच्या वतीने भूमिपूजन सोहळ्यानिमित्त शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा लाख लाडूंचे वाटप करण्यात आले . सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत कार्यकर्त्यांमार्फत घरोघरी तसेच ठिकठिकाणी हे लाडू वाटप करण्यात आले. तर या कार्यक्रमानिमित्त शहर भाजप कार्यालयात शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे , आमदार लक्ष्मण जगताप , महापौर उषा ढोरे , महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्या वतीने श्रीराम पूजन, महाआरती करण्यात आली.

Google Ad

यावेळी नगरसेवक मोरेश्वर शेडगे , संदीप कस्पटे , माजी नगरसेवक राजू दुर्गे , प्रदेश सदस्य अमित गोरखे , अनुप मोरे , संजय परळीकर , धनंजय शाळीग्राम , अमोल दामले , निखिल काळकुटे आदी पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करण्यास मनाई असल्याने भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी पिंपरीतील मोरवाडी कार्यालयात गर्दी न करता त्यांच्या घरावर ध्वज उभारून , रांगोळ्या काढून , लाडूवाटप करीत आनंदोत्सव साजरा केला .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!