Google Ad
Editor Choice Pune

Pune : सर्वसाधारण सभेवरून रंगले राजकारण!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या आयोजनावरून आता सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगले आहे . करोनासंबंधी चर्चा करण्याची सत्ताधाऱ्यांची तयारी नसून प्रशासनाला पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे , तर ऑनलाइन सभा घेण्याचे सरकारचे निर्देश असल्याने सभा तहकूब करून सभासदांना आवश्यक सर्व माहिती घरपोच पाठविण्याचे आदेश आयुक्तांना दिल्याचा दावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला .करोनामुळे चार महिन्यांपासून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज होऊ शकलेले नाही .

यापूर्वीच्या सर्व प्रलंबित सभा बुधवारी घेण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते . त्यामुळे पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज बुधवारी सुरू होताच सर्वपक्षीय विरोधकांनी करोनाविषयी चर्चा करण्याची मागणी लावून धरली . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी ; तर पीपीई किटमध्येच सभागृहात प्रवेश करून व्हेंटिलेटर मिळत नसल्याचे गाहाणे मांडले . विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ , काँग्रेसचे गटनेते आबा बागूल , शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार या सर्वांनी चर्चेचा आग्रह धरला . मात्र , महापौरांनी ऑनलाइन स्वरूपातच सभा घेण्याचे सरकारचे निर्देश असल्याचे सांगून , सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला . हा निर्णय घेतानाच गेल्या साडेचार महिन्यांतील परिस्थितीचा अहवाल सर्व नगरसेवकांना पाठविण्यात यावा , अशा सूचना महापौरांनी आयुक्तांना केल्या .

Google Ad

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!