Google Ad
Editor Choice Pune

सोमवारपासून पुणे लोकल धावणार … पहिली ट्रेन लोणावळ्यासाठी रवाना होणार!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यात मागील सहा महिन्यांहून अधिक काळ लोकल ट्रेन बंद आहे . मात्र सोमवारपासून ( १२ ऑक्टोबर ) लोणावळा लोकल धावणार आहे. पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी पहिली लोकल सुटणार आहे. लोकल सुरु झाल्याने प्रवाशांना मात्र थोडाफार दिलासा मिळणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकातून आज सायंकाळीही दुसरी लोकल ट्रेन धावणार आहे. संध्याकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी दुसरी लोकल ट्रेन पुण्याहून सुटणार आहे. लोणावळा येथून सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी एकच लोकल सोडण्यात येणार आहे.

Google Ad

लोकल ट्रेनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना लोकलमध्ये प्रवेश मिळणार नाही.

लोकलच्या वेळा :-

पुण्यातून – सकाळी ८.०५
सायंकाळी ६.०५
लोणावळ्याहून – सकाळी ८.२०
सायंकाळी – ५.०५

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!