Google Ad
Editor Choice Maharashtra

Nagpur : चारवेळा नगरसेवक झालात , आता आम्हाला संधी द्या , कार्यकर्त्याची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : महापौर संदीप जोशी यांनी (२० ऑगस्ट) वाढदिवसानिमित्त फेसबुक लाईव्हद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी एका कार्यकर्त्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संदीप जोशी यांनी यापुढे नागपूर महापालिकेची निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली.

“आपण चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आला आहात. यापुढे आपण पुन्हा निवडणूक लढवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी द्याल?”,असा सवाल एका कार्यकर्त्याने संदीप जोशी यांना फेसबुक लाईव्हदरम्यान विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना संदीप जोशी यांनी यापुढे महापालिकेची निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं.

Google Ad

“प्रश्न अत्यंत वास्तविक आणि खरा आहे. अनेकदा नेत्यांनीच लढायचं आणि कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलत राहायचं हे बरोबर नाही. मला वाढदिवसानिमित्त तुम्ही शुभेच्छा दिल्या आणि हा प्रश्नदेखील विचारलात. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी आज मी कॅमेऱ्यासमोर जाहीर करतोय की, यानंतर मी महापालिकेची निवडणूक लढवणार नाही. माझ्यानंतरचा जो कुणी कार्यकर्ता असेल, जो पक्षासाठी मेहनत करतोय, तो कार्यकर्ता माझ्या जागेवर लढेल. मी त्याचं काम करेन. पण यापुढे महापालिकेची कोणतीही निवडणूक लढवणार नाही”, असं संदीप जोशी म्हणाले.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

72 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!