Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Pune : नववर्षांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पार्टीत विक्री करण्यात येणाऱ्या आंतरराज्य चरस विक्रेत्यांचे … पुणे लोहमार्ग पोलिसांनी मोडले कंबरडे!

महाराष्ट्र 14 न्यूज : नववर्षांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पार्टीत विक्री करण्यात येणाऱ्या आंतरराज्य चरस विक्रेत्यांचे पुणे लोहमार्ग पोलिसांनी कंबरडे मोडले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, बँगलोर, गोव्यासह वेगवेगळया ठिकाणी चरसचे वितरण केले जाणार होते. हिमाचल प्रदेशातून रेल्वेतून पुण्यात चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 3 लाख 64 हजार रुपये किंमतीचे 34 किलो 404 ग्रॅम चरस जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चररची विंâमत 120 कोंटीवर असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस अधिक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी दिली आहे.

ललित कुमार दयानंद शर्मा (वय-49) आणि कौलसिंग रुपसिंग सिंग (40, दोघेही रा. कुलु, हिमाचल प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. चरस विक्रीसाठी दोघेजण हिमाचल प्रदेश येथून पुण्यात येणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी चार पथके तयार करुन सलग सात दिवस दिल्लीकडून पुण्यात येणाऱ्या रेल्वेवर नजर ठेवत तपासणी केलली. त्यासाठी दरोडा पथकातील अधिकारी व 45 पोलीस अंमलदार यांचे पथक गस्त घालून होते. 19 डिसेंबरला रात्री पावणेअकरा वाजण्याचे सुमारास दोघे जण पुणे रेल्वे स्टेशनमध्ये उतरले. त्यानंतर त्यांनी दोन बॅग घेउन वाडीया ब्रिजच्या दिशेन पळ काढला.

Google Ad

लोहमार्ग पोलिसांनी पाठलाग करून ललितकुमार आणि कौलसिंगला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन बॅगमधील 34 किलो चरस जप्त केला . पुणे लोहमार्ग पोलीसांनी दोघांविरूद्ध एनडीपीसी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात हजर केले असता दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून 34 किलो चरस पैकी 22 किलो चरस मुंबईला, पाच किलो चरस गोव्याला, पाच किलो चरस बँगलोरला, दोन किलो चरस पुण्यात वितरित करण्यात येणार होते. ही कामगिरी लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, पोलीस निरीक्षक मौला सय्यद, पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, संतोष लाखे, माधव केंद्रे, अशोक गायकवाड, गंगाधर ईप्पर, गणेश शिंदे, श्रीकांत बोनाकृती, वैâलास जाधव यांच्या पथकाने केली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!