Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

पिंपरी-चिंचवड, गुन्हे शाखा युनिट- ४ कडुन घरफोड्या करणाऱ्या विधिसंघर्षीत बालका कडुन घरफोडी व वाहन चोरीचे ९ गुन्हे उघड … एकुण ०७,६८,५५०/ – रु . किं . चा मुद्देमाल जप्त!

महाराष्ट्र 14 न्यूज : कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त , पिंपरी – चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड परिसरात घडणारे घरफोडीचे तसेच वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन प्रतिबंध करण्याचे आदेश दिल्याने सुधीर हिरेमठ पोलीस उप आयुक्त , गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व अंमलदार यांना रेकॉर्ड वरील घरफोडी तसेच वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवुन घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणण्याचे आदेशित केले होते .

या अनुशंगाने गुन्हे शाखा युनिट -४ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रसाद गोकुळे यांचे मार्गदर्शनाखाली रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची तपासणी करण्यासाठी पोलीस हवालदार नारायण जाधव , प्रविण दळे, तुषार शेटे , पोलिस शिपाई शावरसिद्ध पांढरे , प्रशांत सैद , सुरेश जायभाये यांचे पथक तयार केले होते . सदर पथकातिल पोलिस शिपाई शावरसिद्ध पांढरे , यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की . एक सराईत गुन्हेगार हा त्याचे एका साथिदारासह नाशिक फाटा येथे चोरीचा मुद्देमाल विक्रीकरिता घेऊन येणार आहे .

Google Ad

सदर बातमीच्या अनुशंगाने गुन्हे शाखा युनिट -४ चे पथकाने नाशिक फाटा येथे सापळा लावुन एक विधिसंघर्षग्रस्त बालक , वय -१५ वर्षे , रा- चक्रपाणी वसाहत , भोसरी यास चोरीच्या काही मुद्देमालासह ताब्यात घेतले . त्यावेळी त्याचा एक साथिदार सदर सराईत गुन्हेगार किरण गुरुनाथ राठोड , रा- दिधी रोड , भोसरी , पुणे हा त्या ठिकाणावरुन पळुन गेला होता . सदर विधिसंर्धग्रस्त बालकास ताब्यात घेवुन त्याचे कडे कसोशिने तपास केला असता त्याने व त्याचे साथिदार १ ) किरण गुरुनाथ राठोड , रा- दिघी रोड , भोसरी , २ ) शेखर संभाजी जाधव , रा- सदगुरु नगर , भोसरी ३ ) विकी कमल मांझी रा भोसरी व ४ ) कृष्णा उर्फ बॉबी संजय तांगतोडे रा . नाशिक यांचेसह मिळुन पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी व वाहन चोरीचे ९ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे .

त्यांचे कडुन तपासादरम्यान घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्ह्यांतील चोरीस गेलेले ६६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने , २८ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने , ०४ एल.सी.डी.टि.व्ही , ०३ मोटारसायकल , ०१ लॅपटॉप , ०१ सॅमसंग कंपनीचा टॅब , ०१ मोबाईल फोन , व ०४ मनघटी घडयाळे , गॅस सिलेंडर व शेगडी असा एकुण ०७.६८.५५० / – रु कि चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . यातिल निष्पन्न आरोपी है रेकॉर्डवरिल घरफोडी जबरी चोरी व वाहन चोरी करणारे सराईत गुन्हेगार असुन आरोपी नामे १ ) किरण गुरुनाथ राठोड याचेविरुद्ध ०४. २ ) शेखर संभाजी जाधव याचेविरुद्ध २३ ३ ) विकी मांझी याचेविरुद्ध १८४ ) कृष्णा उर्फ बॉबी संजय तांगतोडे याचेविरुद्ध १९ गुन्हे नोंद असुन आरोपी २,३ व ४ हे सध्या घरफोडीचे व जबरी चोरीचे इतर गुन्ह्यात येरवडा कारागृहात दाखल आहेत .

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त , रामनाथ पोकळे, पोलीस उप – आयुक्त-गुन्हे सुधीर हिरेमठ, सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा . राजाराम पाटील, पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा , श्रीमती प्रेरणा कट्टे गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा , युनिट -४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे , सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख , सहा.पो.उप.नि. धर्मराज आवटे , पोहवा / प्रविण दळे , नारायण जाधव , संजय गवारे , दादाभाऊ पवार , अदिनाथ मिसाळ, तुषार शेटे , लक्ष्मण आढारी , मो . गौस नदाफ , वासुदेव मुंडे पोशि / शावरसिध्द पांढरे , प्रशांत सैद , सुनिल गुट्टे . तुषार काळे , सुरेश जायभाये , धनाजी शिंदे , आजिनाथ ओवासे , सुखदेव गावंडे , गोंविद चव्हाण , तसेच तांत्रिक विश्लेषन विभाग गुन्हे शाखेचे नागेश माळी , राजेंद्र शेटे , यांनी केली आहे

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!