Google Ad
Editor Choice Pune

Pune : जबरी सोनसाखळी चोरणा – या सराईत गुन्हेगारास मुंढवा पोलीसांकडून अटक … केले आणखी ५ गुन्हे उघड!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे शहरात जबरी सोनसाखळी चोरणा – या सराईत गुन्हेगारास मुंढवा पोलीसांनी पकडुन त्याच्याकडुन ५ गुन्हे उघड केले. दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी सायं. ६ वा च्या सुमारास सौ.जयश्री सुभाष गायकवाड वय -४२ वर्षे , व्यवसाय – घरकाम , रा . स.नं .५ संभाजी चौक , ऑस्कर शाळेजवळ , केशवनगर पुणे या त्यांची मैत्रीणीसोबत वॉकिंगसाठी जात असतांना रेणुकामाता मंदीराजवळ केशवनगर मुंढवा पुणे येथे आल्या असता , अनोळखी दोन इसमांनी दुचाकीवरुन येवुन या महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे किंमत रु ८०,००० / – मनि मंगळसुत्र हिसका मारुन जबरदस्तीने चोरुन नेले होते .

त्याबाबत मुंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे . नमुद गुन्हयाचा तपास सपोनि विजय चंदन हे करत आहेत . सदर गुन्हयाचा तपास चालु असताना मुंढवा पोलीस ठाणे येथील तपास पथकातील पोलीस कर्मचारी दिनेश राणे यांना त्यांच्या विश्वासु बातमीदाराकडुन बातमी मिळाली की , हा चोरीचा गुन्हा आरोपी दिपक माळी , रा.साडेसतरा नळी , हडपसर पुणे , याने त्याच्या साथिदाराबरोबर केला आहे . सदरची बातमी ही त्यांनी मुंढवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव भोसले यांना कळविली . त्यानंतर संपतराव भोसले यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे चंदन यांनी त्यांच्या स्टाफसह संशयीत इसमाबाबत अॅमनोरा टाउनशिपकडुन लोणकर वस्तीकडे येणा – या रोडवर वर आरोपी दिपक माळी व त्याच्याबरोबर असणारा त्याचा साथिदार हे दुचाकी गाडी क्र . एम.एच १२ , आर . एस ८७६४ करडया रंगाची अॅक्टीवा यावरुन येत असताना मिळाल्याने त्यांना पकडले .

Google Ad

त्यावेळी त्यांच्याकडे त्यांचे पुर्ण नाव व पत्याबाबत माहिती घेतली असता दिपक माळी याने त्याचे नाव दिपक परशुराम माळी , हि . वय -२१ वर्षे , रा.ठी- साडेसतरानळी , वकार वस्ती , हडपसर , पुणे , असे त्याचा साथिदार याने त्याचे नाव २ ) मुकेश सुनिल साळुखे , हि , वय -१९ वर्षे , रा.- हडपसर रेल्वे स्टेशन , खराडकर वस्ती , मुंढवा , पुणे असे सांगितले . दोघां आरोपींना मुंढवा पोलीस ठाणे येथे आणुन अधिक तपास केला असता दिपक माळी याने त्याचा साथिदार मुकेश साळुखे याच्या मदतीने दुचाकी गाडीवरुन हा गुन्हा व इतर गुन्हे केल्याचे कबुल केले .

म्हणुन त्यांना सदर गुन्हयात अटक केली आहे . दिपक माळी याच्याकडे केलेल्या सखोल तपासात , त्याने दाखल गुन्हया व्यतीरिक्त कोंढवा पोलीस ठाणे हददीत ०२ सोनसाखळी जबरी चोरीचे गुन्हे , वानवडी व कोथरुड पोलीस ठाणे हददीत प्रत्येकी १ सोनसाखळी जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल करुन त्यात मिळालेले सोन्याचे मंगळसुञ / दागिने हे त्याचे मिञ नामे १ ) प्रमोद सुनिल पाटील , वय- २२ वर्षे , रा . सर्व्हे नं २ ९ / ३ बोराटे वस्ती खरपुडे नगर , पुणे २ ) अनिस अब्दुल रशिद शेख , वय -४ ९ वर्षे , सर्व्हे नं ३५ ताजमहल सोसायटी , सोमनाथ नगर , वडगाव शेरी , पुणे यांच्या मदतीने सराफ जमिर मलंग अत्तर , वय- ४३ वर्षे , रा . सर्व्हे नं ३५ बी / ४ , साईकृपा सोसायटी सोमनाथ नगर , वडगाव शेरी पुणे यास विकल्याचे कबुल केल्याने ते सोन्याचे दागीने व गुन्हयात वापरलेली दुचाकी गाडी असा एकुण ३,४५,००० / – रु कि.चे मुददेमाल जप्त केला असून सराफासही अटक केली .

गुन्हयात अटक केलेला आरोपीत दिपक परशुराम माळी , व त्याचा साथिदार मुकेश साळुखे यांच्या विरुदध जबरी सोनसाखळी चोरीचे ११ गुन्हे दाखल आहेत ते पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहेत . सदरची कामगीरी ही अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग , नामदेव चव्हाण, पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ चे सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग कल्याणराव विधाते , मुंढवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख विजय चंदन , पोलीस कर्मचारी दिनेश राणे , दिपक कांबळे , महेश पाठक , दत्ता विभुते , निलेश पालवे , नाना भादुर्गे , यांनी केली आहे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!