Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुणे शहरातील वाहतूक सुरळीत होण्याकरिता … लष्कर वाहतूक विभागाने केले हे बदल!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होणेकरीता , नागरिकांच्या हरकती व सुचनांचा विचार करून डॉ . संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त , वाहतुक शाखा , पुणे शहर यांनी तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत .

तरी नागरीकांनी याबाबत आपल्या काही सुचना असल्यास त्या अपर पोलीस आयुक्त , वाहतूक शाखा , येरवडा पोस्ट ऑफीस , बंगला नं- ६ जेल रोड पुणे यांचे कार्यालयात दिनांक – ३० / ० ९ / २०२० ते दिनांक – १४/१०/२०२० पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात असे कळवण्यात आले आहे. नागरीकांच्या सूचन व हरकती विचार करुन व अत्यावश्यक सेवेतील वाहने ( उदा . फायरब्रिगेड , पोलीस वाहने , रुग्णवाहीका , इ . ) खेरीज करून अंतिम आदेश काढण्यात येतील . “ सदर ठिकाणी या कार्यालयाकडून यापुर्वी काही निर्बंध घालण्यात आले असतील तर ते रद्द समजण्यात येतील . ”

Google Ad

लष्कर वाहतुक विभाग पुणे अंतर्गत , पुढील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत :-

🔴गोळीबार मैदान चौक व महावीर चौकाकडुन ईस्ट स्ट्रीट रोडवर जाणा – या वाहतुकीला एम . जी . रोडवरील महावीर चौक ते नाझ चौका दरम्यान असलेल्या सबवे लेन मधुन उजवीकडे वळण्यास सुरु करण्यात येत आहे .

🔴ईस्ट स्ट्रीट रोडवरुन एम . जी . रोडवर जाणा – या वाहतुकीला जॉर्ज हॉटेल चौक ते इंदिरा गांधी चौका दरम्यान असलेल्या माझेरीन लेन मधुन उजवीकडे वळण्यास सुरु करण्यात येत आहे .

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!