Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : रविवार ४ ऑक्टोबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रविवार ( दि.४ ऑक्टोबर २०२० ) रोजी ५५७ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ५१७ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील १३ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर आज ६९१ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०९ पुरुष – च-होली – (४० वर्ष), चिंचवड (६२ वर्ष, ३१ वर्ष), पिंपळे गुरव (३६ वर्ष, ६० वर्ष, ६१ वर्ष), पिंपरी (७० वर्ष), पिंपळे निलख (७२ वर्ष), रावेत (६६ वर्ष) ०४ स्त्री – चिखली (७५ वर्ष) दापोडी (६२ वर्ष), पिंपळे सौदागर (५७ वर्ष), निगडी (८९ वर्ष) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०५ पुरुष – सहकार नगर (७८ वर्ष), जुन्नर (६३ वर्ष), खडकवासला (५७ वर्ष), आंबेगाव (७७ वर्ष), भोर (६२ वर्ष) ०२ स्त्री – जुन्नर (४८ वर्ष), विश्रांतवाडी (५२ वर्ष) येथील रहिवासी आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १३१४ पथकांव्दारे २१३१२५६ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये १८५४ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता ४३४ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.

पाऊस असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!