Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Pune : तोंडाला मास्क लावून मोबाईल चोरी करणाऱ्याला पुणे डेक्कन पोलिसांनी नाशिक मधून केली अटक!

महाराष्ट्र 14 न्यूज : डेक्कन पोलीस ठाणे गुन्हा नोंदक्र . १६/२०२१ भा.दं.वि. कलम ३८० मधील फिर्यादी गणेश पुडंलिक पाटील , रा वारजेजकात नाका पुणे हे फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौक येथील सागर आर्केड इमारतील मोबाईल एक्सप्रेस या दुकानामध्ये मॅनेजरचे काम करीत असुन दिनांक ०५/०२/२०२१ रोजी नेहमीप्रमाणे दुकानात काम करीत असताना सायं .०६ / ५० वा सुमा.एक अनोळखी इसम वय २१ वर्षे अंगात ग्रे रंगाचे टि शर्ट घातलेला तोंडाला मास्क लावलेला इसम हा मोबाईल खरेदी करण्याचे बहाण्याने दुकानात आला . व त्याने वन प्लस ८ टी व वन प्लस ८ प्रो असे दोन महागडे मोबाईल खरेदी करण्याचे बहाण्याने घेवुन ते मोबाईल पळवून नेल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे .

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना मिळुन आलेले फुटेज व बातमीदारांकडुन माहीती घेवुन तांत्रिक विश्लेषण करुन संशयित आरोपी बाबत तपास केला असता फुटेज मध्ये चोरी करताना दिसणारा इसम हा नाशिक येथील सिटी सेंटर मॉल येथे असल्याबाबत माहीती मिळाल्याने मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मुरलीधर करपे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री किशोर शिंदे व तपास पथकातील स्टाफ यांनी नाशिक येथ’ गेले.

Google Ad

तेथे जावुन आरोपीचा कसोशिने शोध घेतला असता फुटेज मध्ये दिसण्या – या वर्णनाचा इसम हा नाशिक येथील सिटी सेंटर मॉलसमोरील कॅफे जंक्शन या हॉटेलसमोर असले बाबत माहीती मिळाल्याने दिनांक ०७/०२/२०२१ रोजी १६ / १ ९ वा . सुमारास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करुन वरील चोरीस गेलेले दाखल गुन्हयातील किंमत रुपये १,०२.९९ ८ / – मोबाईल जप्त करुन ताब्यात घेतले असुन इसम नामे तोयस संजय पाटील , वय १ ९ वर्षे , रा , एन ५३ व्ही / एफ / २ / १८ / ३ पाटीलनगर त्रिमुर्तीनगर , सिडको नाशिक याला अटक करण्यात आलेली आहे .

पुढील अधिक तपास चालु आहे . सदर कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग श्री संजय शिंदे , मा.पोलीस उप आयुक्त झोन १ डॉप्रियंकानारनवरे , मा . सहा पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग श्री मालोजी पाटील , मा . वरिष्ठ पोलीसनिरीक्षकडेक्कन पोलीस ठाणे श्री मुरलीधरकरपे , मा . पोलीसनिरीक्षक ( गुन्हे ) श्री संजय मोगले , पोलीस उप निरीक्षक श्री किशोर शिंदे , पोलीस हवालदार पांचाळ , गुजर , पोलीस अंमलदार तरंगे , भांगले , वाघमोडे , लोंढे यांनी तपास केलेला आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!