Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकारी व कर्मचारी या फ्रंट लाईन वर्कर यांना कोविड-१९ लसीकरणाची सुरुवात

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार पिंपरी, चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना कोरोना प्रतिबंधक ( कोविड-१९ ) लस देण्यास मंगळवारी (ता. ९) सुरुवात करण्यात आली आहे. तर पहिली लस पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतली तसेच दुसरी लस अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांना देण्यात आली. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यापासून या लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे.

कोरोना काळात सर्वच पोलीस रस्त्यावर उतरून कोरोना संकटाला लढा देत होते. कित्तेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर काही पोलिसांचा मृत्यूही झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, त्यामध्ये प्राधान्याने पोलिसांना लस देण्यात येत आहे. तसेच पिंपरी, चिंचवड पोलीस आयुक्तालयात सध्या ३ हजार पेक्षा अधिक पोलीस कार्यरत आहेत.

Google Ad

तर चिचंवड येथील आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये जम्बो लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी सर्व पोलिसांचे लसीकरण २ ते ३ दिवस सुरु राहणार आहे. दरम्यान, आयुक्तलयातील १५ ठाणी गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, यासह अनेक विविध शाखा आणि अन्य विभागात कार्यरत असलेल्या सर्व पोलिसांना ठरलेल्या नियोजनाप्रमाणे नियमानुसार लस दिली जाणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!