Google Ad
Editor Choice Pune

Pune : विद्यार्थी – विद्यार्थिनींचे आरोग्य लक्षात घेता पुण्याच्या महापौरांनी घेतला हा निर्णय … या तारखे पर्यंत शाळा बंद!

महाराष्ट्र 14 न्यूज : गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आता सुरू करण्यात आल्या होत्या. पण, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे महापालिकेनंही शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ जानेवारीपर्यंत शाळा बंद राहणार आहे, असा आदेश पालिकेनं काढला आहे. पुणे महापालिकेनं एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. कोरोनाची परिस्थितीत पाहता सध्या शाळा सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या शाळा या ३ जानेवारी २०२१ पर्यंत बंदच राहणार आहे. कोरोनाची परिस्थिती जर कमी झाली तर त्याबद्दल नव्याने निर्णय घेण्यात येईल, असंही पालिकेनं आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा म्हणून दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व दुकानं ही सुरूच राहणार आहे, असंही पालिकेनं स्पष्ट केले. याआधी पुणे महापालिकेनं २३ नोव्हेंबरपासून शाळा उघडण्याची घोषणा केली होती. पुणे पालिका क्षेत्रातील इयत्ता नववी ते १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले होते. पण, कोरोनाची परिस्थिती आणि रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे महापालिकेनं आपला निर्णय मागे घेतला आहे. या आदेशाची आजपासूनच अंमलबाजवणी करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

83 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!