Google Ad
Editor Choice Pune

 pune : सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आज दुपारी भीषण आग … आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आज दुपारी भीषण आग लागली होती. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश मिळालं. दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आग विझल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली व त्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, “ही आग इमारतीत सुरु असलेल्या वेल्डिंगच्या कामादरम्यान लागली असावी.” महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक अंदाजानुसार या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. तिथे विजेचं आणि वेल्डिंगचं काम सुरु होतं, त्यादरम्यान ही आग लागली असावी.” मोहोळ म्हणाले की, “सुरुवातीला आम्हाला माहिती मिळाली होती की, इमारतीत चार जण अडकले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर आम्हाला माहिती मिळाली की, या आगीत एक मजला जळून खाक झाला आहे, तसेच यावेळी पाच जण दगावले आहेत. मृतांमध्ये इमारतीच्या बांधकामावर काम करणारे कंत्राटी कामगार असू शकतात.”

Google Ad

पुण्यातील मांजरी परिसरात असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीत आज दुपारी आग लागली होती. या आगीवर जवळपास तीन तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश आलं. कोव्हिशील्ड या कोरोना विषाणूवरील लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येते. गुरुवारी (21 जानेवारी) दुपारी दोन वाजता इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरत गेले. अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!