Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवडमध्ये आता मीटरनुसार द्यावे लागणार पैसे … रिक्षा प्रवासाला आता मीटरनुसार किती पैसे लागणार?

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवडकरांचा आता रिक्षाचा प्रवास यापुढे मीटरनुसार होणार आहे. कारण पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वत: मीटर डाऊन करुन रिक्षा प्रवासाला सुरुवात केल्यामुळे आजपासून पिंपरी-चिंचवडकरांना रिक्षा प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार नाहीत.

मिटरशिवाय रिक्षा पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात चालवल्या जातात. रिक्षा चालक अनेकदा प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारतात, त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठी लूट या ठिकाणी सुरु असते. त्याचबरोबर रिक्षा चालकांकडून अनेकदा भाडे नाकारले जाते, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाचाही सामना करावा लागतो. अशावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये आता मीटरनुसार रिक्षाचे भाडे आकारले जाणार असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Google Ad

रिक्षा प्रवासाला आता मीटरनुसार किती पैसे लागणार?

पिंपरी-चिंचवडमध्ये आजपासून रिक्षा प्रवास करायचा झाल्यास,
>> 1 किलोमीटरसाठी दिवसा 18 तर रात्री 23 रुपये
>> 2 किलोमीटरसाठी दिवसा 25 तर रात्री 31 रुपये
>> 3 किलोमीटरला दिवसा 37 तर रात्री 46 रुपये
>> 5 किलोमीटरला दिवसा 62 तर रात्री 77 रुपये
>> 10 किलोमीटरला दिवसा 123 तर रात्री 154 रुपये मोजावे लागणार आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!