Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सांगवीतील श्री समर्थ मित्र मंडळ व श्री कामठे युवा मंच कडून यावर्षीच्या गणेशोत्सवात कौतुकास्पद उपक्रम!

महाराष्ट्र 14 न्यूज : श्री समर्थ मित्र मंडळ व श्री ऊर्फे श्रीकांत कामठे युवा मंच, जुनी सांगवी पवार नगर माधील या मंडळाने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मंडळा तर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पण या वर्षी चा गणेशोत्सव जरा आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्याचे आमच्या मंडळाने ठरविले आहे. या वर्षी अखंड जग जे करोना नावाच्या महामारी सोबत लढत आहे आणि सर्वसामान्य माणसाला या मुळे जो मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या हानी झाली आहे, आणि ह्या कारणांमुळे श्री समर्थ मित्र मंडळा ने या वर्षी चा गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करायचे ठरविले आहे.

आपलं मंडळ नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी तत्पर असते. मागील वर्षी देखील महाराष्ट्रात महापूर आला होता. त्यावेळी देखील माणसां सोबत जनावरांना पण खुप हाल सोसावे लागले होते. त्यावेळी माणसांना समाजाच्या प्रत्येक स्तरातून मदत पोहचत होती. पण मुक्या जनावरांना खायला चारा उपलब्ध होत नव्हता. त्या मुक्या जनावरांची आर्त हाक ऐकून श्री समर्थ मित्र मंडळा तर्फे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गावांमध्ये जनावरांना १० टन चारा वाटप करण्यात आला होता. या वर्षी करोना मुळे माणसां वर लाॅकडाऊन मुळे आर्थिक संकट ओढावलं आहे. त्यामुळे या वर्षी श्री समर्थ मित्र मंडळाने वर्गणी गोळा केली नाही.

Google Ad

या उलट मंडळ समाजाला काही तरी देणं लागते या विचाराने सर्व वर्गणीदारांना करोनाशी दोन हात करण्यासाठी रोग प्रतिकारक साधन सामग्रीच वाटप केले.
यामधे सॅनिटायजर,मास्क आणि मंडळ्या गणपती बाप्पांची प्रतिमा देण्यात आल्या, आपणा सर्वांच्या तर्फे व श्री समर्थ मित्र मंडळा तर्फे श्री विघ्नहर्ता गजाननाला आम्ही प्रार्थना करतो कि “या करोना नामक विघ्नातून लवकरात लवकर जगाला बाहेर काढ” आतापर्यंत जसा तुमचा आशिर्वाद मंडळाच्या पाठी राहीला आहे तसाच भविष्यत हि राहतील अशी अपेक्षा मंडळाला आहे. या उपक्रम राबवण्यात आल्याने परिसरात नागरिकाकडुन कौतुक होत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!