Google Ad
Editor Choice Education Maharashtra

‘महाराष्ट्र 14 न्यूज’ च्या बातमीची घेतली दखल … सिंधुदुर्गातील ‘ त्या ‘ मुलीच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढाकार

महाराष्ट्र 14 न्यूज : देशात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. यामध्ये शाळा तसंच कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. दरम्यान शाळा कॉलेज बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली. मात्र प्रत्येकाकडे इंटरनेटची सुविधा नसल्याने काहींना अडचणी आल्या. अशी सिंधुदूर्गातील एका मुलीला ऑनलाईन लेक्चरसाठी अडचणी येत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. महाराष्ट्र 14 न्यूज नेही ही बातमी दिली होती. ही बातमी सर्व ठिकाणी व्हायरल झाली, आता या मुलीच्या मदतीसाठी थेट पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेतला आहे.

सिंधुदूर्गातील दारिस्ते गावात राहणारी ही मुलगी स्वप्नाली सुतार. काही दिवसांपूर्वी एका झोपडीमध्ये बसून अभ्यास करतानाचा तिचा फोटो व्हायरल झाला. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने या मुलीला मदत करण्याच्या सूचना यंत्रणांना दिल्या. त्यानुसार स्वप्नालीला लॉपटॉपपासून ते इंटरनेट कनेक्शनपर्यंतची मदत करण्यात आली आहे. ऑनलाईन लेक्चरसाठी स्वप्नालीला तांत्रिक अडचणी येत होता. तिचा अभ्यास व्हावा यासाठी तिच्या भावांनी तिच्यासाठी घरापासून 2 किमी अंतरावर एक शेड तयार करून दिली. त्यामध्ये बसून स्वप्नाली अभ्यास करत होती. अशाच एक तिचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.

Google Ad

पतंप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या मदतीबद्दल सुतार कुटुंबियांनी आभार मानले आहेत. तसंच भाजपच्या महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्वप्नालीचे फोटो ट्विट करत मोदींनी धन्यवाद दिलेत.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

18 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!