Google Ad
Editor Choice Maharashtra

Mahad : माणुसकीला महत्त्व देत अविरतपणे बीडच्या २४ वर्षाच्या ‘रिअल हिरो किशोर लोखंडे’ न तब्बल २६ तास चालवलं पोकलेन!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तारिक गार्डन ही पाच मजली इमारत २४ ऑगस्टला संध्याकाळच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेला ४० तास उलटल्यानंतर हे शोध कार्य संपलं. या दुर्घटनेतील बचावकार्याला गती देण्यासाठी माणुसकीला महत्त्व देत अविरतपणे एका रिअल हिरोने तब्बल २६ तास पोकलेन चालवलं आहे. किशोर भागवत लोखंडे (२४) असे या व्यक्तीचे नाव आहे.

किशोर लोखंडे हा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबडेवी या ठिकाणी राहतो. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, अग्निशमन दल, विविध स्वयंसेवी संस्थांनी बचावकार्यात पुढाकार घेतला. या बचावकार्यात गती यावी यासाठी किशोरने तब्बल 26 तास अविरतपणे पोकलेन चालवलं. या खऱ्या नायकाने प्रशंसनीय असे काम केले. त्यामुळे महाड दुर्घटनेनतंर शोधकार्यात तो खरा रिअल हिरो ठरला. त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!