Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : अजित पवार आणि सरकारमधील अन्य वजनदार नेत्यांनाच पोलिसांची नोटीस … राजकीय वर्तुळात खळबळ!

महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे . अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील , खासदार सुनील तटकरे , कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे , शिवसेनेचे मुंबईतील नेते सचिन अहिर यांच्यासह ११ जणांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नोटीस बजावली आहे . राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी २०१८ मध्ये पोलिसांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता . त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे . या सगळ्यांनी मंत्रालयासमोर तत्कालीन सरकारविरोधात आंदोलन केलं होतं . सदर प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत .

अजित पवार आणि अन्य नेत्यांविरोधातील दोषारोपपत्राची प्रत शिवडी न्यायालयातून घेऊन जाण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी कामकाजाच्या वेळी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.दरम्यान , सध्याच्या सरकारमधील वजनदार नेत्यांनाच पोलिसांची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे . तत्कालीन सरकारविरोधातच आंदोलन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असली तरीही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना न्यायालयात उपस्थित राहावं लागणार आहे .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!